कोरोना संपल्याशिवाय मास्कमुक्ती नाही, अजित पवारांचे सूचक वक्तव्य

आमचे तीन पक्षांचे सरकार असून यामध्ये मित्र पक्षांनी पाठींबा दिला आहे. असे निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असतात आज चांगला दिवस आहे. मला विकासकामांची पाहणी करायची होती यामुळे आलो असे अजित पवारांनी सांगितले.

ajit pawar and aditya thackeray visit mumbai no mask free maharashtra until corona ending
कोरोना संपल्याशिवाय मास्कमुक्ती नाही, अजित पवारांचे सूचक वक्तव्य

कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यामुळे महाराष्ट्र मास्कमुक्त होणार अशीच चर्चा सुरु आहे. परंतु कोरोना संपल्याशिवाय मास्कमुक्ती नाही असे स्पष्ट वक्तव्य उपमुख्यंत्री अजित पवार यांनी केलं आहे. कोरोना संपल्यावर मास्कमुक्तीबाबतची माहिती पत्रकार परिषद घेऊन देण्यात येईल असे अजित पवार यांनी सांगितले आहे. मुंबईत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी विकासकामे केली आहे. या विकासकामांचा आढावा घेतला आहे. राज्य सरकराने विकासकामे थांबवली नाही. महाविकास आघाडी सरकारमधील युवा नेतेसुद्धा चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेण्यात येत असल्याचे अजित पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांना महाराष्ट्र मास्कमुक्तीबाबत प्रश्न करण्यात आला होता. अजित पवार म्हणाले की, मास्कमुक्तीबाबत मंत्रिमंडळात अशी काही चर्च झाली नाही. कोरोना जात नाही तोपर्यंत मास्क लावायचा, कॅबिनेट असते तेव्हा अशा चर्चा केल्या जातात परंतु अशा चर्चा करु नका, जेव्हा मास्क काढायचा असेल तेव्हा आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगू असे अजित पवार म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरेंकडून चांगलं विकासकाम

मुंबईतील विकासकामांची पाहणी केल्यानंतर अजित पवार म्हणाले, बऱ्याच दिवसांपूर्वी मंत्रिमंडळातील सहकारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना सांगितले होते की, मुंबईतील विकासकामांची माहिती मला मिळाली आहे. त्यामुळे विकासकामे पाहण्याची मला उत्सुकता होती. मग आम्ही ठरवले की वरळीपासून सुरुवात करायची आणि माहिमला दौरा संपवायचा. कोणाला त्रास होऊ नये यासाठी आम्ही पाहणीची माहिती दिली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात काम चांगलं सुरु आहे. नव्या चेहऱ्यांना सरकारमध्ये संधी दिली आहे. अशावेळी काम सुरु आहेत. जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा पाहिला तर लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्रफळ, ग्रामीण भागाची लोकसंख्या असे धरुन नियम केला जातो आणि त्यानुसार वाटप करण्यात येते. यामुळे मुंबईला निधी कमी मिळतो हा निधी जास्त मिळाला तर आणखी विकासकामे करता येतील. सीएसआर, राज्य सरकार, कॉर्पोरेटचा फंड मिळून विकासकामे सुरु आहेत. सर्वच नगरसेवक चांगली काम करत आहेत तसेच त्या कामात काही अडचणी आहेत का? याबाबतची माहिती घेतली आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी युतीची चर्चा नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी अजित पवारांसाठी गाडीचं सारथ्य केलं. दोन्ही नेत्यांमध्ये आलेल्या जवळीकतेमुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी – शिवसेना युती होणार का? अशी चर्चा सुरु होती. याबाबत अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले की, गाडी चालवली म्हणजे.. गाडी चालवायची आवड असते प्रत्येकाची आवड असते. त्यांनी गाडी चालवली म्हणून अंदाज लावण्याचे कारण नाही. मुख्यमंत्री अनेकदा वर्षावर येताना गाडी चालवतात हे प्रत्येकाचे पॅशन असते. आमचे तीन पक्षांचे सरकार असून यामध्ये मित्र पक्षांनी पाठींबा दिला आहे. असे निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असतात आज चांगला दिवस आहे. मला विकासकामांची पाहणी करायची होती यामुळे आलो असे अजित पवारांनी सांगितले.


हेही वाचा : …अन् आदित्य ठाकरेंकडून अजितदादांसाठी स्टेअरिंग हातात घेत गाडीचं सारथ्य