गुजरात – ग्रामीण भागात ६५० कोटींची वीज बिले होणार माफ

गुजरात – ग्रामीण भागात ६५० कोटींची वीज बिले होणार माफ

प्रातिनिधिक फोटो

गुजरात राज्यातील ग्रामीण भागातील रहिवाशांसाठी राज्य सराकारने एक गुड न्यूज दिली आहे. राज्यात ग्रामीण क्षेत्रात राहाणाऱ्यांचे थकीत वीज बिल माफ करण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला आहे. ग्रामीण क्षेत्रात थकीत असलेले तब्बल ६५० कोटी सरकार माफ करणार आहे. राज्यातील ६.२२ लाख वीज धारकांना याचा फायदा होणार आहे. यामध्ये घराचे, उद्योगाचे आणि शेतीचे वीज बिलाचा समावेश आहे. मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्यांत काँग्रेसची सत्ता आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ यांनी सत्तेत येताच काही तासातच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. यानंतर ही घोषणा केल्यामुळे भाजप सरकार हे लोकांना खूष करण्याचे प्रयत्न करत असल्याच्या टीका विरोधकांकडून केल्या जात आहे.

दंड भरुन थकीत रक्कम होणार माफ

काही लोकांनी वीज चोरी केली आहे किंवा ओव्हर लोडमुळे वीज बिल भरणा केली नाही अशा ग्राहकांना कलम १२६ आणि १३५ अंतर्गत ५०० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. हा दंड भरल्यानंतर त्यांची थकीत रक्कम माफ केली जाणार आहे. येवढेच नव्हे तर पैसे न भरल्यामुळे कोणाची वीज कापली असेल तर त्यांनाही पून्हा जोडणी दिली जाणार आहे. शहरी क्षेत्रात BPL आधारावर वीज बिल माफ केले जाणार आहे.

राहुल गांधीवर केली टीका

राफेल प्रकरणी भाजपावर खोटे आरोप लावून देशाची दिशाभूल केल्यामुळे गुजरातचे मुख्यंत्री विजय रुपाणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर टीका केली आहे. सुप्रिम कोर्टाचा निर्णय हा काँग्रेसच्या थोबाडीत मारल्या सारखा आहे. देशाची दिशाभूल करणाऱ्या राहुल गांधींनी आपले पद सोडावे अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

First Published on: December 18, 2018 5:29 PM
Exit mobile version