मुघलांचा तिरस्कार करता तर लाल किल्ला पाडून टाका; नसीरुद्दीन शाह असं का म्हणाले?

मुघलांचा तिरस्कार करता तर लाल किल्ला पाडून टाका; नसीरुद्दीन शाह असं का म्हणाले?

Taj Divided By Blood | मुंबई – राजकीय आणि सामाजिक विषयांवर बेधडक मतं मांडणाऱ्या अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी मुघलांची बाजू घेत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘हल्ली मुघल शासकांना जबरदस्तीनं खलनायक म्हणून चित्रित केलं जात आहे. तसंच मुघलांनी बांधलेला लाल किल्ला तोडून टाका, असं नसिरुद्दीन शाह म्हणाले आहेत. ताज डिव्हायडेड बाय ब्लड ही त्यांची नवी वेबसीरिज येत आहे. या वेब सीरिजच्या निमित्ताने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

हेही वाचा अक्षय कुमारने केला भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज; म्हणाला… “जेव्हा लोक काहीही बोलतात, तेव्हा..”

नसीरुद्दीन शाह म्हणाले की, ज्या लाल किल्ल्याला आपण पवित्र मानतो, तो मुघलांनीच बांधला होता. तरीही त्यांनी जे केलं ते वाईट आणि भयानकच होतं, तर मग ताजमहल, लाल किल्ला आणि कुतुबमिनार पाडून टाका.

‘हल्ली मुघल शासकांना जबरदस्तीनं खलनायक म्हणून चित्रित केलं जातं. मुघलांच्या चांगल्या कामाकडं कानाडोळा करून त्यांना केवळ आक्रमक म्हणून दाखवलं जातं. कधी कधी मला हसू येतं. अकबर आणि खुनी आक्रमक नादिर शाह किंवा तैमूर यांच्यातील फरक लोकांना सांगता येत नाही. नादिर शाह आणि तैमूर इथं लूटमार करायला आले होते हे खरंच आहे. पण मुघल लुटायला आले नव्हते. ते इथं राहायला आले होते आणि त्यांनी तसंच केलं. त्यांचं योगदान कोणी कसं नाकारू शकतो, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचा – बॉलिवूडच्या “चांदणी”ची आज पाचवी पुण्यतिथी; पोस्ट शेअर करत पती आणि मुलगी झाले भावूक

‘आपल्या परंपरा विसरून मुघलांचं उदात्तीकरण करण्यात आलं असं काही लोक म्हणतात, त्यात काही प्रमाणात तथ्य आहे. पण म्हणून त्यांना खलनायक ठरवण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले. दरम्यान, ताज: डिव्हाइडेड बाय ब्लड ही वेबसारिज ३ मार्चपासून Zee 5 वर प्रसारित होणार आहे.

First Published on: February 24, 2023 6:47 PM
Exit mobile version