ठरलं! ‘चांद्रयान २’ घेणार २२ जुलैला अवकाशात झेप

ठरलं! ‘चांद्रयान २’ घेणार २२ जुलैला अवकाशात झेप

भारताच्या महत्वाकांक्षी तसेच बहुप्रतिक्षीत मोहीमेपैकी एक मानल्या जाणाऱ्या ‘चांद्रयान-२’ चे प्रक्षेपण तांत्रिक कारणांमुळे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र ‘चांद्रयान २’ च्या प्रक्षेपणाची नवी तारिख इस्रोकडून घोषित करण्यात आली आहे. ‘चांद्रयान २’ हे २२ जुलै रोजी अवकाशात झेप घेणार असून त्याचे प्रक्षेपण २ वाजून ४३ मिनिटांनी होणार आहे.

‘चांद्रयान २’ च्या प्रक्षेपणाची नवी तारख जाहीर

१५ जुलै रोजी सोमवारीच्या मध्यरात्री २ वाजून ५१ मिनीटांनी सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-३ च्या मदतीने भारताचे हे यान आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून हे चांद्रयान-२ अवकाशात झेप घेणार होते. मात्र ऐनवेळी आलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे हे प्रक्षेपण रद्द निर्णय घेण्यात आला होता. परंतु, इस्त्रोकडून ‘चांद्रयान २’ च्या प्रक्षेपणाच्या नव्या तारखेची आज घोषणा करण्यात आली आहे. २२ जुलै रोजी ‘चांद्रयान २’ चे हे प्रक्षेपण होणार असल्याचे इस्त्रोकडून सांगण्यात आले आहे.

First Published on: July 18, 2019 11:24 AM
Exit mobile version