घरदेश-विदेशतांत्रिक अडचणींमुळे चांद्रयान-२ चे आज प्रक्षेपण रद्द

तांत्रिक अडचणींमुळे चांद्रयान-२ चे आज प्रक्षेपण रद्द

Subscribe

आजचे प्रक्षेपण रद्द करण्यात आले असून लवकरच इस्रोकडून नवीन तारखेची घोषणा करण्यात येणार

भारताच्या महत्वाकांक्षी तसेच बहुप्रतिक्षीत मोहीमेपैकी एक मानल्या जाणाऱ्या चांद्रयान-२ अवकाशात झेप घेण्यास झाले होते, मात्र चांद्रयान-२ चे होणारे प्रक्षेपण तांत्रिक कारणांमुळे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे चांद्रयान-२चे होणारे आजचे प्रक्षेपण रद्द करण्यात आले असून लवकरच नवीन तारखेची घोषणा इस्रोकडून करण्यात येणार आहे.

- Advertisement -

सोमवारी मध्यरात्री २ वाजून ५१ मिनीटांनी सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-३च्या मदतीने भारताचे हे यान आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून हे चांद्रयान-२ अवकाशात झेप घेणार होते. मात्र ऐनवेळी आलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे हे प्रक्षेपण रद्द निर्णय घेण्यात आलेला आहे.

- Advertisement -

संपुर्ण भारतासह जगाचे इस्रोच्या या महत्त्वकांक्षी मोहीमेकडे लक्ष लागलेले होते. आजच्या प्रक्षेपणानंतर ५२ दिवसांनी हे चांद्रयान-२ चंद्रावर पोहचणार होते. ही मोहीम यशस्वी झाल्यास ही मोहीम यशस्वी झाल्यास या प्रकारची शक्ती असलेला अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश असणार आहे.

ही आहेत ‘चांद्रयान-२’ ची वैशिष्ट्ये

  • चांद्रयान-२ एकूण १२ भारतीय उपकरणे घेऊन जाणार आहे.
  • आठ हत्तींच्या वजनाच्या इतके चांद्रयान-२ चे वजन ३.८ टन आहे.
  • चांद्रयान-२ चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणार आहे. आजपर्यंत चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणारी कुठलेली मोहीम झालेली नाही.
  • चंद्राच्या ज्या भूभागावर आत्तापर्यंत कोणीही संशोधन केले नाही, अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-२ संशोधन करणार आहे.
  • १३ भारतीय पेलोड असतील त्यातील ८ ऑर्बिटर, ३ लँडर आणि २ रोव्हर असतील. याशिवाय नासाचे एक पॅसिव्ह एक्सपेरिमेंट देखील असेल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -