कारगिलहून श्रीनगर मार्गावरील 500 फूट खोल दरीत कोसळली कार; ८ जणांचा मृत्यू झाल्याची भीती

कारगिलहून श्रीनगर मार्गावरील 500 फूट खोल दरीत कोसळली कार; ८ जणांचा मृत्यू झाल्याची भीती

कारगिलहून श्रीनगर मार्गावरील 500 फूट खोल दरीत कोसळली कार; ८ जणांचा मृत्यू झाल्याची भीती

कारगिलहून श्रीनगरला (Kargil Srinagar) जाणारी तेवरा कार (Tavera Vehicle) रस्त्यावरून घसरल्याने 400 – 500 फूट खोल दरीत कोसळली आहे. यात 7 ते 8 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी रात्री उशिर ही घटना घडल्याची माहिती समोर येतेय. प्राथमिक माहितीनुसार, कारगिलहून श्रीनगरला जात असताना कार घसरून झोजिला घाटात पडली, त्यामुळे 7 ते 8 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या पोलीस, लष्कर आणि स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले असून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. (Road Accident)

दरम्यान श्रीनगर – लेह राष्ट्रीय महामार्गावर दररोज अपघात होत असतात. त्यामुळे काळजीपूर्वक गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांना या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लावते, बेदरकारपणे वाहन चालवणे आणि वाहकांच्या निष्काळजीपणामुळे अनेकदा या ठिकाणी वाहने दरीत कोसळून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

यापूर्वीही खड्ड्यात वाहन घसरून टँकर चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली, श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्गावरील झोजिला पासजवळ हे वाहन रस्त्यावर घसरले आणि खोल दरीत जाऊन कोसळले, यात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला.


Monkeypox treatment : मंकीपॉक्स व्हायरसवर सापडलं औषध, लॅन्सेट रिसर्चमधून मोठा खुलासा


 

First Published on: May 26, 2022 8:06 AM
Exit mobile version