कर्नाटकच नाही तर ‘या’ राज्यांतही काँग्रेसच्या दोन नेत्यांत आहेत वाद

कर्नाटकच नाही तर ‘या’ राज्यांतही काँग्रेसच्या दोन नेत्यांत आहेत वाद

कर्नाटकात सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी चुरस पाहायला मिळाली, तशीच अनेक राज्यांमधेही काँग्रेसची हीच अवस्था आहे.

कर्नाटकातील विधानसभेच्या 224 जागांपैकी काँग्रेसनं 135 जागा जिंकत एकहाती विजय मिळवला. तर भाजप 66 जागा आणि जेडीएस 19 जागाच जिंकू शकले. 13 मे रोजी कर्नाटक राज्याचा निकाल लागला. तेव्हापासून सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यापैकी कोण कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री होणार? हा प्रश्न कायम होता. ( Karnataka Election 2023 Not only in Karnataka but in other states also the two Congress leaders are at loggerheads ) परंतु आता कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याचा पेच अखेर सुटला आहे. सिद्धरमय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री पद देण्याचा निर्णय पक्षानं घेतला आहे. तशी घोषणा काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबतच्या दीर्घ चर्चेनंतर कर्नाटकात सरकार स्थापनेसाठी एकमत झालं. शनिवारी (20 मेला बंगळुरूत कर्नाटकमधील नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे.

त्यामुळे काँग्रेसने दुसऱ्यांदा सिद्धरमय्या यांनाच मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवण्यामागचं कारण काय? तसचं कर्नाटकात जसा मुख्यमंत्री पदावरुन पेच निर्माण झाला. तशीच काहीशी अवस्था इतर राज्यांतही असल्याचं चित्रं आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

75 वर्षांचे सिद्धरमय्या यांनी 2006 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. म्हणजेच सिद्धरमय्या यांचं काँग्रेसशी नातं केवळ 17 वर्ष जुन आहे. तर डीकेशिवकुमार हे मागच्या 43 वर्षांपासून काँग्रेसमध्यचे आहेत. आता पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष सिद्धरमय्या यांनाच मुख्यमंत्री पदाची धुरा सोपावत आहे. परंतु डीके शिवकुमार यांना मात्र उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागत आहे. या मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे ‘जात’. आपल्या देशातील राजनिती ही जातींवर आधारित आहे. कर्नाटकाची राजनिती ही लिंगायत आणि वोकालिग्गा या जातींभोवती फिरते . त्यामुळे आता काँग्रेस नवा डाव खेळून कुरबा समाजातून येणाऱ्या सिद्धरमय्या यांना मुख्यमंत्री बनवल्याचं बोललं जात आहे.

जशी आता कर्नाटकात सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी चुरस पाहायला मिळाली, तशीच अनेक राज्यांमधेही काँग्रेसची हीच अवस्था आहे. काँग्रेसचे अंतर्गत वाद हे अनेक राज्यामंध्ये आहेत. जसं की, राजस्थान, छत्तीसगढ, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक.

2018 ला जेव्हा राजस्थानचा विधानसभा निवडणुकीचा निकाल आला तेव्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट होते. त्यांच्या नेतृत्त्वात पक्षानं विजयी कामगिरी केली होती. पंरतु अशोक गेहलोत पक्षाचे वरिष्ठ नेते असल्यानं त्यांना मुख्यमंत्री पद आणि सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आणि आज पायलट हे आपल्याच सरकारच्या विरोधात पदयात्रा करत आहेत. तसचं त्यांनी गेहलोत यांच्याविरोधात जनसंघर्ष यात्राही काढली होती.

( हेही वाचा: कोण आहेत अर्जुन मेघवाल? मोदी कॅबिनेटमध्ये कायदा मंत्रीपदाची मिळाली जबाबदारी )

मध्यप्रदेशात तर ज्योतिरादित्य सिंधिंया यांनी पाठिंबा काढून घेतल्यानं काँग्रेसचं सरकार कोसळलही होतं. पंजाबमध्येही कॅप्टर अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वादही सर्वश्रूत आहे. तसचं छत्तीसगढमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि टीएस सिंह देव यांच्यातील वादही चव्हाट्यावर आले आहेत. तर हिमाचल प्रदेशात सुखविंदरसिंह सुख्खू आणि प्रतिभा सिंह यांच्या गटातही वादावादी होतच असतात. महाराष्ट्रातही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात मतभेद आहेत. त्यामुळे आता कर्नाटकात सिद्धरमय्या हे मुख्यमंत्री पदी जरी विराजमान होणार असतील तरीही या सरकारची वाटचाल कशी होते हे पाहणं महत्त्वांच ठरणार आहे.

First Published on: May 18, 2023 3:25 PM
Exit mobile version