अफगाणिस्तानच्या काबूलमधील गुरुद्वारावर दहशतवादी हल्ला; दोन जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानच्या काबूलमधील गुरुद्वारावर दहशतवादी हल्ला; दोन जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) राजधानीतील गुरुद्वारामध्ये इस्लामिक स्टेटच्या (IS) दहशतवाद्यांनी गोळीबार (Terrorist Attack Gurudwara) केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या दहशतवादी हल्ल्यात (Terror Attack) एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या जखमींची प्रकृतीही गंभीर असल्याचे समजते. (Karte Parwan Sikh Gurdwara In Kabul Comes Under Terror Attack)

मिळालेल्या माहितीनुसार, काबूलमधील कार्ट-ए-परवान गुरुद्वारामध्ये हा गोळीबार झाला. गुरुद्वाऱ्याच्या आसपासच्या परिसरात गोळीबार करण्यात आला. स्फोटही घडवून आणल्याचे समजते. या स्फोटात एका मृत्यू झाला. याशिवाय 7 ते 8 लोक अजूनही गुरुद्वारामध्ये अडकले आहेत. तसेच, दोन हल्लेखोर अजूनही गुरूद्वारात असल्याचे सांगितले जात आहे.

शीख समुदायाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

तालिबानकडून अद्याप या हल्ल्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र आता ज्या गुरूद्वाऱ्यावर हल्ला झाला आहे, तिथं यापूर्वीही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. मात्र, पुन्हा एकदा झालेल्या हल्ल्यामुळे अफगाणिस्तानमधील शीख समुदायाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


हेही वाचा – पुलवामामध्ये दहशतवाद्यांकडून पोलिसाची घरात घुसून हत्या

First Published on: June 18, 2022 12:31 PM
Exit mobile version