MCD Election: निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस, आप-भाजपमध्ये काँटे की टक्कर

MCD Election: निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस, आप-भाजपमध्ये काँटे की टक्कर

नवी दिल्ली – गुजरात विधानसभा मतदानाचा पहिला टप्पा काल पार पडला. आता अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे ते चार डिसेंबर रोजी होणाऱ्या दिल्ली महापालिका (Municipal Corporation of Delhi) निवडणुकांकडे. दिल्ली महापालिकेच्या (MCD) चाव्या कोणाकडे जातात हे ठरवण्यासाठी चार डिसेंबर रोजी ठरणार आहे. त्यासाठी सुरू असलेल्या प्रचार (Election Campaign) फेऱ्यांचा आजचा शेवटचा दिवस. सायंकाळी पाच वाजल्यानंतर प्रचार फेऱ्या थंडावतील.

हेही वाचा – रामाच्या अस्तित्वाबाबत संशय घेणारे आता ‘रावण’ घेऊन आले आहेत, मोदींचा पलटवार

१९९७, २००२ आणि २००७ च्या निवडणुकांवेळी उमेदवार मतदानाच्या आदल्या दिवशी प्रचार करू शकत होते. परंतु, त्यानंतर झालेल्या तीन निवडणुकावेळी मतदानाच्या आदल्यादिवशी प्रचार फेऱ्या करण्यास मनाई करण्यात आली. दिल्ली राज्य निवडणूक आयोगाने शांततेत मतदान पार पाडण्याकरता मतदानाच्या आदल्यादिवशी प्रचार फेऱ्यांना मनाई केली आहे.

हेही वाचा – ‘अजूनही वेळ गेलेली नाही…’, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर करत जडेजाचे गुजरातवासीयांना आवाहन

दिल्लीतील महानगरपालिकेत आपली सत्ता कायम ठेवण्याकरता भाजपाने जोर लावला आहे. आपल्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी भाजपाचे अनेक मंत्री प्रचारसभेत उतरले आहेत. गल्ली-गल्लीत जाऊन नेत्यांनी मतदारांशी संवाद साधला. भाजपा आणि आप या दोन्ही पक्षांमध्ये कडवी झुंज होणार आहे. दिल्लीतील विकासाच्या मुद्द्यावर ‘आप’ने मते मागितली आहेत तर, भाजपाने ‘आप’ला निशाण्यावर घेत मते मागितली आहे. त्यामुळे प्रचाराचा आजचा अंतिम टप्पा आणखी गाजण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी ५ वाजल्यानंतर दिल्लीतील प्रचार थंडावणार आहे. प्रचाराची शेवटची वेळ जवळ येतेय त्याप्रमाणे भाजपाचा आक्रमकपणा वाढत जाताना दिसतोय.

हेही वाचा – Exclusive : बाळासाहेब ठाकरेंच पहिलं स्मारक बंद का?; शिवकालीन शस्त्रही ‘रामभरोसे’

दिल्लीत ड्राय विक

दिल्लीत महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळपासून रविवारी सायकंळपर्यंत दारूची दुकाने बंद राहणार आहेत. सात डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे, त्यादिवशीही दिल्लीत ड्राय डे असणार आहे. दिल्लीत ४ डिसेंबर रोजी २५० वॉर्डांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाचा निकाल सात डिसेंबर रोजी लागेल. दिल्ली अबकारी विभागाने मतदान आणि निकालाच्या दिवशी दारुविक्री बंदी आणली आहे.

First Published on: December 2, 2022 9:01 AM
Exit mobile version