घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रExclusive : बाळासाहेब ठाकरेंच पहिलं स्मारक बंद का?; शिवकालीन शस्त्रही 'रामभरोसे'

Exclusive : बाळासाहेब ठाकरेंच पहिलं स्मारक बंद का?; शिवकालीन शस्त्रही ‘रामभरोसे’

Subscribe

स्मारकाची लाईटही गूल, घाणीचे साम्राज्य आणि शस्त्र रामभरोसे

नाशिक : राज्यभरात महापुरुष, त्यांचा इतिहास, त्यांची स्मारक यावरून राजकीय रान पेटल आहे. त्यातच आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी बाळासाहेब ठाकरे याञ्च्जे मुंबईतील महापौर बंगल्यात होत असलेले स्मारक राज्य सरकारने आपल्या ताब्यात घ्यावे अशी मागणी केल्याने महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांना जाऊन दशक लोटलय. तरीही त्यांच्या स्मारकाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही आणि त्यावरून होणारे राजकारणही थांबलेले नाही. परंतु, बाळासाहेब ठाकरे यांचे पहिले स्मारक म्हणून ज्याकडे बघितले जाते ते नाशिकच्या गांगपूर रोड भागातील बाळासाहेब ठाकरे स्मारक शस्त्र संग्रहालय याकडे बघायला कोणालाच वेळ नाहीये. आज या स्मारकाची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. प्रचंड घाण, गाजरगवत, मोडकळीस आलेले साहित्य अश्या परिस्थितीत हे स्मारक आज आहे. स्मारक उभारत असतानाच बाळासाहेब यांच्या ज्वलंत व्यक्तिमत्वाला शोभेल असे शस्त्र संग्रहालय याठिकाणी उभारण्यात आले. परंतु शस्त्र संग्रहालयही आज धूळखात बंद आहे. नाशिकसाठी भूषण ठरू शकत असणारे हे बाळासाहेब ठाकरे स्मारक शस्त्र संग्रहालय आज नाशिकरांसाठी खुले का नाही, ते असे धूळखात का पडले आहे असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

नाशिक महानगरपालिकेत २०१२साली मनसेची सत्ता आल्यानंतर अकार्यक्षमतेवरुण मनसेवर खूप मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कंबर कसत सीएसआर फंडातून शहरात काही प्रकल्प उभारून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला त्यातच गांगपूररोड भागातील महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या भूखंडावर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक सीएफआर फंडातून उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या स्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रांचे, स्वराज्याच्या इतिहासाला उजळणी देणारे चित्र, तसेच इतिहास सांगणारा लेझर-शो आदीची उभारणी करण्यात आली. जीव्हीके या खाजगी कंपनीने सीएसआरच्या माध्यमातून या सगळ्याची उभारणी केली. मात्र, या कंपनीचा कार्यकाळ संपल्यानंतर स्मारकाची वाताहत व्हायला सुरवात झाली ती आजवर सुरूच आहे. याबाबत वेळोवेळी अनेकांनी आवाज उठवला परंतु पालिका प्रशासनाकडून त्याला कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही.

- Advertisement -
नव्याने १० कोटींचा खर्च

खरतर, दीड वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चिला गेला. त्यावेळी महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि मनसे हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेब होते. यावेळी प्रकल्पाची वाताहत होण्यावरून मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. त्यानंतर या प्रकल्पात काही नवीन सुधारणा करण्याच्या हेतूने पालिकेने काही निधी उपलब्ध करून दिला. मात्र, नवीन सुधारणेचेही काम आज अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे बघायला मिळते. तब्बल १० कोटी रुपये खर्च करून याठिकाणी जुने दगडी प्रवेशद्वार पाडून नव्याने प्रवेशद्वार उभारले जात आहे. साहसी खेळांचे उद्यान उभारले जात आहे. तसेच शस्त्र संग्रहालयाचेही सौदर्यीकरण केले जाणार आहे. अशी माहिती महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून देण्यात आली.

बंद का ?

महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून केल्या जात असलेल्या नव्या सुधारणा आणि निर्मितींची खरच आवश्यकता होती का असाही सवाल उपस्थित केला जातोय. जरी, नव्याने सुधारणा केल्या जात असल्या तरी शस्त्र संग्रहालय आजही जर स्वच्छता करून खुले केले तर त्याठिकाणी नाशिककर आणि पर्यटकांना शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्र, जीवनपट उलघडणारी चित्र, लेझर-शो आदीचा अनुभव घेता येईल. परंतु, संग्रहालय आणि स्मारक दोन्हीही सुधारनेच्या नावाखाली मागील वर्षभरपासुन थेट बंदच ठेवण्यामागे कारण काय असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे.

- Advertisement -
 लाईटही गूल

महानगरपालिका प्रशासनाचे प्रकल्पाकडे इतके दुर्लक्ष झाले आहे की आजच्या घडीला महावितरणच्या विजेचे बिल न दिल्यामुळे प्रकल्पाची वीजजोडणी खंडित करण्यात आली आहे. यामुळे याठिकाणी सुरक्षिततेचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचाही वावर याठिकाणी वाढल्याचे तसेच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत छुप्या मार्गाने टवाळखोर आतमध्ये प्रवेश करतात. यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.

सुरक्षा रक्षक नेमायलाही पैसे नाहीत ?

जीव्हीके कंपनीचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रकल्पाची दुरवस्था व्हायला सुरवात झाली. ही बाब राज ठाकरे यांना समजल्यानंतर त्यांनी नाशिक मधील एक उद्योजकांना प्रकल्पाची देखभाल करण्याची विनंती केली. काही महिन्यांनी तांत्रिक अडचणीमुळे त्यांनाही प्रकल्पाची देखभाल थांबवावी लागली. त्यानंतर त्याठिकाणी त्यांचा कोणताही कर्मचारी नव्हता. शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्र सुरक्षितता महत्वाची असल्याने त्या उद्योजकांनी त्याठिकाणी आजपर्यंत सुरक्षा रक्षाकाची नेमणूक केलेली आहे. त्या सुरक्षा रक्षाकाचा पगारही उद्योजकामार्फतच देण्यात येतो. महानगरपालिकेला स्वताचाच इतका मोठा महत्वपूर्ण तसेच एतिहासिक शस्त्रास्त्र, वस्तु यांमुळे शहराचं भूषण ठरू शकणार्‍या प्रकल्पाची सुरक्षा करण्यासाठीही निधि नाहीये का असाही प्रश्न उपस्थित करण्यात येतोय.

 महानगरपालिकेच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे स्मारकात नव्याने काही बदल केले जात आहेत. ज्यात नवीन प्रवेशद्वार, साहसी खेळांच उद्यान, शस्त्र संग्रहालयाच सौंदर्यीकरण आदींचा समावेश आहे. ज्यासाठी दोन वेगवेगळ्या प्रकल्पांना मिळून जवळपास १० कोटींचा खर्च केला जात आहे. सद्यस्थितीत काम प्रगतिपथावर आहे त्यामुळे प्रकल्प नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. : शिवकुमार वंजारी, उपायुक्त, बांधकाम विभाग

 बाळासाहेब ठाकरे यांचे पहिले स्मारक आणि त्यांच्या व्यक्तित्वाला साजेसे असे शस्त्र संग्रहालय सीएसआर फंडातून राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प उभारण्यात आला. परंतु, मनसे सत्ताकाळात उभारलेला प्रकल्पाचे श्रेय मनसेला जाईल या खुज्या मानसिकतेमधून प्रकल्पाची वाट लावण्याचे काम सत्ताधार्‍यांनी केले आहे. : संतोष कोरडे, स्थानिक मनसे पदाधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -