‘अजूनही वेळ गेलेली नाही…’, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर करत जडेजाचे गुजरातवासीयांना आवाहन

गुजरात विधानसभा निवडणुकासाठी आज पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी मतदान सुरू असून, आपल्या उमेदवाराला सर्वाधिक मत मिळावी यासाठी पक्षाचे नेतेमंडळी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.

गुजरात विधानसभा निवडणुकासाठी आज पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी मतदान सुरू असून, आपल्या उमेदवाराला सर्वाधिक मत मिळावी यासाठी पक्षाचे नेतेमंडळी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. अशातच भारतीय क्रिकेट संघाचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजा देखील त्याची पत्नी रिवाबा जडेजाला विजयी होण्यासाठी तिचा प्रचार करत असल्याचे दिसत आहे. नुकताच जडेजाने ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. जडेजाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एका भाषणात केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तसेच, ‘अजूनही वेळ गेलेली नाही हे गुजरातच्या लोकांना कळायला हवं’ असे लिहिले आहे. (cricketer ravindra jadeja has shared balasaheb thackerays video about narendra modi on twitter)

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षानंही आपले अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. रविद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाला भाजपकडून जामनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मतदानाच्या पूर्वसंध्येला रविंद्र जडेजाने मोदींबाबत बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

रविंद्र जडेजाने बाळासाहेब ठाकरेंना जुना व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्यात ठाकरेंनी मोदी गेला तर गुजरात गेला, असे वक्तव्य केले आहे. याशिवाय हा व्हिडिओ पोस्ट करताना जडेजाने अजूनही वेळ आहे हे गुजरातच्या लोकांना कळायला हवे, असे म्हटले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रविंद्र जडेजा पत्नी रिवाबाला जामनगरमधून विजयासाठी लोकांना मतदान करण्याचे आवाहन करत आहे. आज जामनगरमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे.


हेही वाचा – महागाईचा फटका! भारताचा वृद्धिदर निम्म्याने घसरला, कृषीक्षेत्र मात्र तेजीत