Live Update: महाड दुर्दैवी घटना: दोन चिमुरड्यांचा कारमध्ये गुदमरुन मृत्यू

Live Update: महाड दुर्दैवी घटना: दोन चिमुरड्यांचा कारमध्ये गुदमरुन मृत्यू

रायगडमधील महाड येथील नांगरवाडी फाटा येथील दुर्दैवी घटना घडली आहे. दोन चिमुरड्यांच्या कारमध्ये गुदमरुन मृत्यू झाल्याचे सोमर आले आहे. पोलीस, रेस्क्यू टीमने कारच्या काचा फोडून मुलांना बाहेर काढलं आहे.


मुंबईत गेल्या २४ तासांत २ हजार ६५४ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून ४६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ५ हजार १४२वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ८ हजार ९२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


राज्यात गेल्या २४ तासांत १८ हजार ३१७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४८१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६वर पोहोचला असून ३६ हजार ६६२ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.


राज्यातील ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. तसेच ५ ऑक्टोबरपासून राज्यात हॉटेल, फूट कोर्ट, रेस्टॉरंट्स आणि बार सुरू ५० टक्के सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.


कोरोनाच्या महामारीत एसटी कामगार जिवाची बाजी लावून काम करीत असताना तीन-तीन महिने वेतन मिळत नसल्याने एसटी कर्मचारी हवालदील झाले आहेत. उपासमारीमुळे तर काही जणांनी टोकाचे पाउल उचलले आहे. वेतन कायद्यानुसार महामंडळाने वेळेवर वेतन देणे बंधनकारक असताना. निधी नसल्याचे कारण सांगून राज्यसरकारकडून मदत मागितली आहे. परंतु या वेतनासाठी मदत ही मिळेनाशी झालेली आहे. याबाबत संघटनेने मुख्यमंत्री आणि परिवहण मंत्री यांच्या बरोबर पत्रव्यहार केला. प्रत्यक्ष भेटून विनंतीही केली आहे. मात्र पगार मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे जर येत्या ७ तारखेपर्यंत जुलै, ऑगस्ट दोन महिन्यांचे प्रलंबित वेतन आणि सप्टेंबर महिन्यांचे देय वेतन न मिळाल्यास महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने विभागाचे पदाधिकारी राज्यभरातील सर्व विभागीय कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत.


गेल्या वर्षी आरे येथे मेट्रोसाठी कापण्यात येणारी वृक्षतोड थांबविण्याकरिता आंदोलन केलेल्या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावी अशी विनंती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत केली. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर सदस्यांनी देखील याला अनुमोदन दिले. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे गुन्हे लगेच मागे घेण्याची कार्यवाही करावी असे निर्देश गृह विभागास दिले.


लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस सामूहिक बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबाशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बातचित केली.


जागतिक आरोग्य संघटनेने ओडिशा सरकारचे कौतुक केले. कारण अ‍ॅम्फान चक्रीवादळ असूनही परप्रांतीयांची गर्दी होत असताना कोविड-१९ व्यवस्थापन नीट केल्याने ओडिशा सरकारचे कौतुक केले आहे.

 


टेनिसपटू सेरेना व्हिलिअम्सची फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार. दुखापत झाल्याने तिने माघार घेतल्याचे ट्विट एएनआयने केले आहे.


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहार निवडणुकीत भाजपचे प्रचार प्रमुख म्हणून काम पाहाणार. पक्षानं केली अधिकृत घोषणा

अभिनेता गुरमीत आणि त्याची पत्नी अभिनेत्री डेबिना या दोघांनाही कोरोनाची लागण झाली असून याबाबत डेबिनाने सोशल मीडियावर माहिती दिली आहे.


पालघर आणि ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाचे विभाजन करून अस्तित्वात आलेल्या मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे कामकाज १ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. राज्य सरकारने तशी अधिसूचना आज, बुधवारी जारी केली. सदानंद दाते यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्तालयाचे मुख्यालय मीरारोड येथे असणार आहे.


बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुशांत सिंह राजपूतचे वडिल के. के. सिंह यांनी भेट घेतली.


Babri Masjid Verdict : २८ वर्षांनी खटल्यातल्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता!

बाबरी मशीद पाडणं हा पूर्वनियोजित कट नव्हता, असं निरीक्षण या प्रकरणातील विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव यांनी नमूद केलं आहे. त्यामुळे पूर्वनियोजित कट असल्याचा आजपर्यंतचा दावा यामुळे निराधार ठरत आहे. तसेच, सीबीआयने आपल्या आरोपपत्रात हा पूर्वनियोजित कट असल्याचा दावा करण्या आला होता. मात्र, न्यायालयानंं हे निरीक्षण नमूद केल्यामुळे या कलमाखाली केलेले आरोपही निराधार ठरू शकतात. (सविस्तर वाचा)


उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेवरून वातावरण तापले असून लोकांनी रस्त्यावर उतरून पीडितेच्या न्यायासाठी निदर्शने केली. यावेळी त्यांनी पोलीस प्रशासन आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.


दिग्दर्शक अनुराग कश्यप यांना मुंबई पोलिसांनी पायल घोष यांच्या तक्रारीवरून समन्म बजावले आहे. त्यांना उद्या, गुरूवारी सकाळी ११ वाजता वर्सोवा पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. पायल घोष यांनी अनुराग यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाथरस घटनेवर भाष्य केले असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे.


यशवंत जाधव यांची मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष पदावर हॅटट्रीक

मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी यशवंत जाधव यांना तीसर्यांदा शिवसेनेने उमेदवारी दिलीय. महापालिका मुख्यालयात यशवंत जाधव यांनी स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी संध्या दोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणी चौकशीसाठी तीन सदस्यांची एसआयटी स्थापन केली असून त्यांनी सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेस देण्यात आले आहेत. तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. (सविस्तर वाचा)


देशात कोरोनाबाधितांची संख्या ६२ लाखांच्या पार गेली असून गेल्या २४ तासांत ८० हजार ४७२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच १ हजार १७९ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण ६२ लाख २५ हजार ७६४ इतके कोरोना रुग्ण झाले आहेत. यात ९ लाख ४० हजार ४४१ इतके अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत ९७ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. तर ५१ लाख ८७ हजार ८२६ जणांनी कोरोनाच्या आजारावर यशस्वी मात केली आहे. (सविस्तर वाचा)


आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार देशभरातून आतापर्यंत ७ कोटी ४१ लाख ९६ हजार ७२९ इतक्या जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर २९ सप्टेंबर रोजी १० लाख ८६ हजार ६८८ इतक्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत.


दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या मृत्यूनंतर मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी तिचा मृतदेह गावी आणला. मात्र, गावकरी आणि पीडिती कुटुंबीयांच्या विरोधानंतरही पोलिसांनी रातोरात या पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. यासंबंधीचे ट्विट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले असून सोबत त्यांनी घटनास्थळाचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. तसेच या प्रकरणावरून त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. (सविस्तर वाचा)


ठाणे पश्चिमेतील पोखरण क्र. १ वरील सौ. सुलोचना सिंघानिया शाळेजवळील रेमण्ड कंपनीच्या कार्यालयाल भीषण आग लागल्याची घटना आज, बुधवारी पहाटे घडली. आगीची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस अधिकार, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. (सविस्तर वाचा)


१९९२ मध्ये बाबरी मस्जिद पाडल्याच्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालय आज, बुधवारी निकाल देणार असून त्यात भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आरोपी आहेत. तब्बल २८ वर्षानंतर या प्रकरणातील निकाल दिला जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे याकडे लागले आहे.

First Published on: September 30, 2020 10:26 PM
Exit mobile version