घरCORONA UPDATEचिंताजनक! देशातील कोरोनाबाधितांची संख्या ६२ लाख पार

चिंताजनक! देशातील कोरोनाबाधितांची संख्या ६२ लाख पार

Subscribe

देशात कोरोनाबाधितांची संख्या ६२ लाखांच्या पार गेली असून गेल्या २४ तासांत ८० हजार ४७२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच १ हजार १७९ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण ६२ लाख २५ हजार ७६४ इतके कोरोना रुग्ण झाले आहेत. यात ९ लाख ४० हजार ४४१ इतके अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत ९७ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. तर ५१ लाख ८७ हजार ८२६ जणांनी कोरोनाच्या आजारावर यशस्वी मात केली आहे, याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

तसेच आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार देशभरातून आतापर्यंत ७ कोटी ४१ लाख ९६ हजार ७२९ इतक्या जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर २९ सप्टेंबर रोजी १० लाख ८६ हजार ६८८ इतक्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत.

दरम्यान, राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असला तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. राज्यात काल १९,२१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १०,६९,१५९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७८.२६ टक्के एवढे झाले आहे. तर राज्यात काल १४,९७६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच ४३० कोरोनाबाधिता रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा ‘डिजिटल ’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -