CBI वाद : अलोक वर्मांना CVCकडून क्लिन चीट नाही

CBI वाद : अलोक वर्मांना CVCकडून क्लिन चीट नाही

सर्वोच्च न्यायालय

सीबीआयमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आता सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना सर्वोच्च न्यायालयानं आरोपांवरील चौकशी अहवालाला उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. सीव्हीसी अर्थात केंद्रीय चौकशी आयोगानं अलोक वर्मा यांच्यासंदर्भातील चौकशी अहवाल सादर केला आहे. सीव्हीसीचा अहवाल मिश्र आणि परिपूर्ण असल्याचं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांना सांगितलं आहे. दरम्यान, अलोक वर्मा यांनी उत्तर दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय देईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. यावेळी मात्र यावेळी सीबीआय विशेष संचालक राकेश अस्थाना यांना चौकशी अहवाल देण्यास नकार दिला आहे. याप्रकरणातील पुढील सुनावणी २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. अलोक वर्मा यांना उत्तर देण्यासाठी सोमवारपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. २६ ऑक्टोबर रोजी सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी केलेल्या आरोपांबाबत CBIचे संचालक अलोक वर्मा यांच्या चौकशीचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सीव्हीसीला दिले होते. सध्या दोन्ही अधिकारी रजेवर आहेत.

वाचा – ‘हे’ न्यायाधीश करणार सीबीआयच्या संचालकांची तपासणी

काय आहे वाद?

सीबीआयने आपलेच विशेष संचालक आणि क्रमांक दोनचे अधिकारी राकेश अस्थाना यांच्यावर तीन कोटींची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाला क्रमांक एक आणि क्रमांक दोनचे अधिकारी असा वाद असल्याचेही बोलले जात आहे. सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी आलोक वर्मा आणि अस्थाना यांच्यातील वाद या प्रकरणाला कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, हा वाद उफाळून अाल्यानंतर केंद्र सरकारनं या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करत दोन्ही अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. शिवाय १३ अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील केल्या.

वाचा – सीबीआयच्या विशेष संचालकांवर लाच घेण्याचा आरोप

वाचा – CBI खंडणी वाद : संचालक सक्तीच्या रजेवर

First Published on: November 16, 2018 1:18 PM
Exit mobile version