घरदेश-विदेशCBI खंडणी वाद : संचालक सक्तीच्या रजेवर

CBI खंडणी वाद : संचालक सक्तीच्या रजेवर

Subscribe

सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी नागेश्वर राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सीबीआयमधील संचालक आणि उपसंचालक वादावर सरकारनं आता कठोर पावलं उचलली आहेत. सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी नागेश्वर राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संचालक आणि उपसंचालक वादाच्या पार्श्वभूमिवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. सीबीआयचे संचालक आणि उपसंचालकांमध्ये सुरू असलेल्या वादानंतर कॅबिनेटनं हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, संचालक अलोक वर्मा आणि उपसंचालक राकेश अस्थाना यांच्यामधील वाद उफाळून आला होता. खुद्द पंतप्रधानांनी या गोष्टीमध्ये लक्ष घातले होते. शिवाय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देखील साऱ्या प्रकरणामध्ये जातीनं लक्ष घातलं होतं. दरम्यान, मंगळवारी रात्री १० वाजता दिल्लीतील सीबीआय कार्यालयामध्ये सीबीआयच्या विशेष पथकानं छापेमारी केली. यावेळी अलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांची कार्यालये सील करण्यात आली आहेत.


राहुल गांधींनीदेखील या प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदिंवर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

वाद सर्वोच्च न्यायालयात

दरम्यान, आता संचालकांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांनी कोर्टात दाद मागितली आहे. शिवाय प्रशांत भूषण यांनी देखील संचालकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

वाचा – सीबीआयच्या विशेष संचालकांवर लाच घेण्याचा आरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -