घरदेश-विदेशसीबीआयच्या विशेष संचालकांवर लाच घेण्याचा आरोप

सीबीआयच्या विशेष संचालकांवर लाच घेण्याचा आरोप

Subscribe

सीबीआयने आपलेच विशेष संचालक आणि क्रमांक दोनचे अधिकारी राकेश अस्थाना यांच्यावर तीन कोटींची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा असलेल्या सीबीआय अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचा ठपका लागला आहे. सीबीआयने आपलेच विशेष संचालक आणि क्रमांक दोनचे अधिकारी राकेश अस्थाना यांच्यावर तीन कोटींची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाला क्रमांक एक आणि क्रमांक दोनचे अधिकारी असा वाद असल्याचेही बोलले जात आहे. सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी आलोक वर्मा आणि अस्थाना यांच्यातील वाद या प्रकरणाला कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.

तीन लाखांची लाच घेण्याचा आरोप

सीबीआयने अस्थाना यांच्यावर एफआयआर दाखल केली आहे. यामध्ये अस्थाना यांनी मांस व्यापारी मोईन कुरेशीकडून तीन कोटींची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अस्थाना हेच कुरेशीविरोधात सुरु असलेल्या प्रकरणाचा तपास करत होते. अस्थाना यांनी स्वतःवरील आरोप फेटाळत यामध्ये आपल्याला फसवलं जात असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

- Advertisement -

हा आहे अस्थाना यांच्यावरील आरोप

हैदराबादमधील उद्योगपती सतीश बाबू सना यांच्या तक्रारीवरुन सीबीआयने आपल्या संस्थेतील दुसऱ्या क्रमांकाच्या अधिकाऱ्यावर लाच घेतल्याचा ठपका ठेवला आहे. अस्थाना यांना गेल्या वर्षी जवळपास तीन कोटी रुपये दिल्याचा दावा एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. सना यांचा हा दावा सीआरपीसी कलम १६४ नुसार न्यायदंडाधिकाऱ्यासमोर नोंदवण्यात आला असून तो कोर्टालाही मान्य असेल. त्यामुळे मोईन कुरेशीकडून ५० लाख रुपये घेतल्याप्रकरणी सना हे देखील चौकशीच्या घेऱ्यात होते. या प्रकरणाच्या एसआयटीचं मांस व्यापारी कुरेशीविरोधात सुरु असलेल्या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच कुरेशीवर मनी लाँड्रिंग आणि भ्रष्टाचारासह अनेक आरोप आहेत.

अस्थाना यांनी मांडली आपली बाजू

या प्रकरणावर अस्थाना यांनी सीव्हीसी म्हणजेच केंद्रीय सतर्कता आयोगाला पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे. सीबीआयच्या संचालकांनी अजय बस्सी नावाच्या एका अशा अधिकाऱ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नियुक्ती केली आहे. ज्याला नियम तोडण्यासाठी ओळखलं जात. आपल्याला फसवण्यासाठी हा आरोप करण्यात आला असल्याचे त्यांनी पत्रात म्हटलं आहे. अस्थाना यांच्याकडे अनेक हायप्रोफाईल प्रकरणांची चौकशी आहे. ज्यामध्ये ऑगस्टा वेस्टलँड चॉपर घोटाळा आणि उद्योगपती विजय माल्ल्या कर्ज प्रकरणाचाही समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -