Omicron : अमेरिकेत रूग्णांना व्हेंलिटेर्स मिळेनात, स्वित्झर्लंडमध्ये लॉकडाऊन

Omicron : अमेरिकेत रूग्णांना व्हेंलिटेर्स मिळेनात, स्वित्झर्लंडमध्ये लॉकडाऊन

अमेरिका आणि युरोपिय देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पहायला मिळत आहे. या देशांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरीएंट ओमिक्रॉनने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळेच याठिकाणी अधिक मोठ्या प्रमाणात परिस्थिती बिकट होत आहे. अमेरिकेच्या काही राज्यांमध्ये हॉस्पिटमधील बेड्स फुल्ल झाले आहेत. तर अनेक हॉस्पिटलमध्ये रूग्ण दाखल करण्यासाठी जागा नाही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक हॉस्पिटलमधील वेंटिलेटर्सदेखील कमी पडू लागले आहेत, अशी स्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक हॉस्पिटल्स हे रूग्णांना दाखल करून घेण्यासाठी नकार देत आहेत. (Omicron variant in America surging covid-19 cases Switzerland lockdown situation)

अमेरिकेतील मिशिगन राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा कहर निर्माण झाला आहे. याठिकाणी गेल्या २४ तासांमध्ये ११ हजार ७८३ नवे कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. तर अवघ्या २४ तासांमध्ये २३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इंडियानामध्ये गेल्या दोन आठवड्यात कोरोना रूग्णांची संख्या ही ४९ टक्क्यांनी वाढली आहे. हॉस्पिटमध्ये कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.

Covid-19 विरोधी चौथा डोस द्या

अमेरिकेत आतापर्यंत ओमिक्रॉनचे ४३ रूग्ण आढळले आहेत. याठिकाणी हिवाळ्यामुळे कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होताना पहायला मिळत आहे. याठिकाणी ख्रिसमसमुळे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी उसळलेली पहायला मिळत आहे. परिणामी कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढताना दिसत आहे. दुसरीकडे स्विर्त्झलंडमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. ब्रिटनमध्येही कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. युरोपिय देशांमध्ये जर्मनीमध्ये डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की, नागरिकांना कोरोनाच्या लसीचा चौथा डोस देण्याची गरज आहे. जर्मनीत आतापर्यंत ११ लाख लोकांना कोरोना विरोधी तिसरा लसीचा डोस देण्यात आला आहे.

ख्रिसमस शॉपिंग आवरा !

ब्रिटनमध्ये वैज्ञानिकांच्या विश्लेषणानंतर देण्यात आलेल्या अलर्टनुसार जर आगामी ख्रिसमसच्या निमित्ताने जर लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणे थांबवले नाही तर, येत्या जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा नवा व्हेरीएंटचा संसर्ग वाढ शकतो. परिणामी मोठी कोरोना संसर्गाची लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. लंडन स्कुल ऑफ हायजीन एण्ड ट्रॉपिकल मेडिसिनच्या विश्लेषणानुसार दैनंदिन पातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढते आहे. त्यामुळेच आगामी काळात हॉस्पिटलमध्ये भरती होणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. ब्रिटमध्ये ४४८ नवे कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. त्यामध्ये देशात कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटची संख्या ही १२६५ इतकी झाली आहे. देशातील सद्यस्थिती पाहता लोकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करणे हेच हिताचे ठरेल असेही तज्ज्ञांचे मत आहे.

वैज्ञानिकांनी केलेल्या विश्लेषणानुसार डेल्टा व्हेरीएंटपेक्षाही ओमिक्रॉनच्या रूग्णांची संख्या अधिक होऊ शकते. त्यामुळेच अमेरिकेसह युरोपियन देशांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटचा फैलाव वाढू शकतो असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनची रूग्णसंख्या वेगाने वाढते आहे.


Omicron Variant : ओमिक्रॉन व्हेरीएंटच्या संकटामुळे देशात लसीकरणाचा वेग मंदावला

First Published on: December 12, 2021 4:21 PM
Exit mobile version