Coronavirus: कोरोनामुक्त होऊनही आठ महिन्यानंतर दिसतात ‘ही’ लक्षणे

Coronavirus: कोरोनामुक्त होऊनही आठ महिन्यानंतर दिसतात ‘ही’ लक्षणे

Coronavirus: कोरोनामुक्त होऊनही आठ महिन्यानंतर दिसतात 'ही' लक्षणे

जगभरात पुन्हा कोरोना विषाणूचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. यामुळे लोकांची चिंता वाढत आहे. एखादा कोरोनाबाधित रुग्णाला पुन्हा कोरोनाची लागण होत नाही, असे सुरुवात म्हटले जात होते. पण नंतर असे अनेक रुग्ण आढळले ज्यांना कोरोनाची लागण दोन ते तीन वेळा झाली. शिवाय कोरोनामुक्त झाल्यानंतरही लोकांमध्ये लक्षणे दिसल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान कोरोना संदर्भात जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी अजूनही वैज्ञानिक अभ्यास करत आहेत. आता अशाच एका अभ्यासाच्या अहवालातून असा दावा करण्यात आला आहे की, कोरोनाबाधित होऊन महिन्यानंतरही लोकांवर याचा दीर्घकाळ प्रभाव असतो. म्हणजेचे कोरोनाची लक्षणे दिसून येतात.

या नव्या अभ्यासाच्या अहवालानुसार, कोरोनाबाधित झाल्याच्या आठ महिन्यांनंतर दर १० जणांपैकी एका व्यक्ती गंभीर लक्षणाने त्रास होतो. याचा परिणाम त्यांच्या सामाजिक आणि वैयक्तिक जीवनावर नकारात्मक होत आहे, असे समोर आले आहे.

दरम्यान स्वीडनचे डेंडेरिड रुग्णालय आणि कॅरोलिस्का इंस्टिट्यूटचे संशोधकांचा एक ग्रुप गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या दीर्घकाळीन प्रभावासंदर्भात अभ्यास करत आहेत. याचे मुख्य लक्ष्य कोरोनानंतर व्यक्तीमध्ये रोग प्रतिकारशक्तीचा अभ्यास करणे आहे.

या अभ्यासातून काय समोर आले?

कोरोनामुक्त झाल्याच्या आठ महिन्यानंतर लोकांमध्ये सर्वात जास्त दीर्घकाळीने लक्षण दिसली. चव आणि वास घेण्याची क्षमता जाणे आणि थकाव येणे हे दिसून आले. या अभ्यासाचे प्रमुखे संशोधक शारलोट थालिन यांनी सांगितले की, आम्ही तरुण आणि कामावर जाणाऱ्या लोकांच्या आरोग्य समूहात सौम्य कोरोनानंतर दीर्घकालीन लक्षणांची तपासणी केली आणि तेव्हा चव आणि वास घेण्याचा क्षमता जाणे हे मुख्य दीर्घकालीन लक्षण दिसून आले.

पुढे ते म्हणाले की, कोरोनाबाधित असलेल्या लोकांमध्ये थकवा आणि श्वासासंबंधीत समस्या असणे ही सामान्य बाबत आहे. या अभ्यासाचा अहवाल जामा (JAMA) नावाच्या मासिकेत प्रकाशित करण्यात आला आहे.


हेही वाचा – लस घेणाऱ्याला Uber ची मिळणार फ्री राइड, जाणून घ्या कशी कराल राइड बुकिंग


 

First Published on: April 9, 2021 5:54 PM
Exit mobile version