घरताज्या घडामोडीलस घेणाऱ्याला Uber ची मिळणार फ्री राइड, जाणून घ्या कशी कराल राइड...

लस घेणाऱ्याला Uber ची मिळणार फ्री राइड, जाणून घ्या कशी कराल राइड बुकिंग

Subscribe

देशभरात कोरोना लसीकरणाची मोहीम जोरदार सुरू आहे. अशातच अमेरिकी अ‍ॅप बेस्ड कॅब कंपनी उबरने (Uber) एक मोठा निर्णय घेतला आहे. आता लस घेणाऱ्या लोकांना मोफत राइड देण्याचा निर्णय उबरने घेतला आहे. दिल्ली सरकारसोबत उबर कंपनीने या मोहिमेला सुरुवात केली आहे. या अंतर्गत कंपनी १.५ कोटी रुपयांच्या मोफत राइड देणार आहेत. लसीकरण मोहीमेत एक छोटे योगदान असल्याचे कंपनीने मोहिमेची माहिती देताना सांगितले.

अशी घ्या मोफत राइड

  • यासाठी तुम्हाला पहिल्यांदा मोबाईलमध्ये उबर App डाऊनलोड करावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला डाव्याबाजूला वरती वॉलेट (Wallet) या ऑप्शनवर क्विलवर करावे लागेल.
  • वॉलेट ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये प्रोमो कोड 10MV21V टाकावा लागले.
  • यानंतर तुमची फ्री राइड तयार होईल.
  • कंपनीकडून हे ऑप्शन फक्त दिल्लीमध्ये दिले आहे.

दरम्यान कंपनीने सांगितले की, ‘ही मोहिम फक्त दिल्लीपर्यंत मर्यादित न ठेवता इतर ३४ शहरांमध्ये राबवणार आहे.’ कंपनीकडून जे कोणी लोक लसीकरणासाठी जात आहेl, त्याला पिक आणि ड्रॉपची सुविधा मिळेल. त्यामुळे तुम्हाला प्रोमोकोड गरजेचा असून याद्वारे तुम्ही लसीकरण सेंटरला जाऊ शकता.

- Advertisement -

देशाची राजधानी दिल्लीत कोरोना पुन्हा एकदा थैमान घालायला सुरुवात केली आहे. यामुळे दिल्लीतील परिस्थिती आणखीच बिकट होत चालली आहे. आतापर्यंत दिल्लीत ६ लाख ९८ हजार ५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ११ हजार १५७ जणांचा मृत्यू झाला असून ६ लाख ६३ हजार ६६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या २३ हजार १८१ रुग्णांवर उपचार सुरू आहे.


हेही वाचा – ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांना भेडसावतोय एकटेपणा, मानवी स्पर्शाचा डिस्पोजेबल ग्लव्ह्ज इंटरनेटवर गाजतोय

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -