काश्मीर वाद चर्चेने सोडवू – इम्रान खान

काश्मीर वाद चर्चेने सोडवू – इम्रान खान

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान

एरवी भारताच्या नावानं खडे फोडणारे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना आता चर्चेच्या मार्गाची उपरती झाली आहे. काश्मीरचा प्रश्न युद्धाने सुटणार नाही. हा फक्त चर्चा करून सुटू असतो. दोन – तीन मुद्दे आहेत ज्यावर दोन्ही देश विचार करू शकतात असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. इस्लामाबाद येथे आयोजीत केलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अनेक वर्षाच्या वैरानंतर आता भारत-पाकिस्तानला नाते सुधरवण्याची गरज असल्याचेही मत त्यांनी यावेळी वक्त केले. दरम्यान चीनने ही भारत आणि पाकिस्तान यांच्या मधील नाते सुधरवण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

काय म्हणाले पंतप्रधान

“भारत-पाकिस्तान २००४ साली काश्मीर प्रश्न सोडवण्याच्या खूप जवळ पोहोचला होता. त्यावेळी सरकार बदलले म्हणून हा प्रश्नसुटू शकला नाही. मात्र जर भाजपचेच सरकार निवडून आले असते तर हा प्रश्न तेव्हाच सुटला असता. भारताचे दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी यांनाही तसाच विश्वास होता. माझ्या कार्यकाळात हा प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे.” – इम्रान खान, पंतप्रधान पाकिस्तान

काश्मीर प्रश्नांवर अजूनही प्रश्नचिन्ह

इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान झाल्यावर काश्मीरच्या प्रश्नांवर चार्चेला वेग आला आहे. मागील अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान दरम्यान काश्मीरचा प्रश्न उपस्थीत केला जात आहे. भारत पाकिस्तानमध्ये काश्मीर प्रश्नावर द्विपक्षीय चर्चा सुरू आहे. मात्र नेमका काश्मीरचा मुद्दा कधी सुटणार आहे यावर प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे.

First Published on: December 4, 2018 12:13 PM
Exit mobile version