घरदेश-विदेशदहशतवादाच्या नावाखाली पाक युद्ध लढणार नाही- इम्रान खान

दहशतवादाच्या नावाखाली पाक युद्ध लढणार नाही- इम्रान खान

Subscribe

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचे आरोप फेटाळले आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात इतर देशांच्या तुलनेत अधिक कारवाई केल्याचा दावा त्यांनी केला.

दहशत वादी हल्ल्या बद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यावर आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रत्योत्तर दिले आहे. अमेरिकेच्या दबावाखाली येऊन पाकिस्तान कोणतेही युद्ध लढणार नाही. पाकिस्तान दहशतवादाला स्थान देत असल्याचे वक्तव्य ट्रम्प यांनी केले होते. तसेच पाकिस्तानला देशातंर्गत दहशत वादाविरुद्ध लढण्यासाठी सांगितले. दहशतवाद विरोधी लढाईत पाकिस्तान साथ देत नसल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता. याच बरोबर पाकिस्तानला अमेरिकेकडून दिली जाणारी १.३ अब्ज डॉलर्सची मदतही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानला येत्या काळात अनेक संकटे निर्माण होणार आहे.


पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे सध्या देशांतर्गत दौऱ्यावर आहेत. उत्तर वजीरिस्तान येथे एका सभेला संबोधित करत असताना इम्रान खान यांनी असे वक्तव्य केले. यावेळी देशातील लष्कर दल, सुरक्षा एजन्सी आणि इतर सुरक्षा दलांना त्यांनी केलेल्या कारवाईबद्दल त्यांना अभिनंदन केले. पाकिस्ताने दहशत वाद्यांविरोधा जितकी कारवाई केली आहे तितकी अन्य कोणत्याही देशाने केली नसल्याचा दावाही त्यांनी केली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -