पायलटची विनाअट सुटका करा; भारताचा पाकला इशारा

पायलटची विनाअट सुटका करा; भारताचा पाकला इशारा

पायलट अभिनंदन

भारताच्या वायूदलाचा पायलट वर्थमान अभिनंदन याची सुटका विनाअट करण्याची मागणी भारताने केली आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेसाठी कुठल्याही प्रकारच्या वाटाघाटी करण्याचा भारताने नकार दिला आहे. तसेच अभिनंदन यांची तात्काळ सुटका करण्यात यावी, अशी मागणी भारताने केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयामधील सूत्रांनी दिली आहे. तसेच अभिनंदन यांनी काही झाल्याच भार कठोर पावलं उचलेल, असा इशाराही देण्यात आला आहे. १९९९ साली दहशतवाद्यांनी कंधार येथे भारताचे विमान हायजॅक केले होते. तेव्हा नाईलाजास्तव भारतााला जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अजहरला कैदेतून सोडावे लागले होते. तशाच पद्धतीचा काहीचा दबाव पुन्हा एकदा भारतावर टाकण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे. पायलटला आपल्या ताब्यात ठेवून भारतासोबत करार करू पाहत आहेत. मात्र अभिनंदन यांच्या सुटकेबाबत कोणताही करार अथवा चर्चा करणार नसल्याचे भारताने पाकला सांगितले आहे.

First Published on: February 28, 2019 3:53 PM
Exit mobile version