Petrol-Diesel Price Today: सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यानंतर आजचे दर काय? जाणून घ्या

Petrol-Diesel Price Today: सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यानंतर आजचे दर काय? जाणून घ्या

Petrol-Diesel Price Today: सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यानंतर आजचे दर काय? जाणून घ्या

देशात सलग दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढत होते. २२ मार्च आणि २३ मार्चला पेट्रोल-डिझेलचे दर ८०-८० पैशांनी वाढले. यामुळे सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल खरेदी करण्यासाठी साडेचार महिन्यांनंतर अधिकचे पैसे मोजावे लागत आहे. १३७ दिवसांनंतर २२ मार्चला पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल करण्यात आला होता. आता सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यानंतर आज पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.

आज कच्च्या तेलाचे दर वाढले

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. नायमॅक्स क्रूड १.६८ टक्क्यांनी वाढल्यानंतर ११६.६१ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आणि ब्रँट क्रूड १.७१ टक्क्यांनी वाढल्यानंतर १२३.३१ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे.

आजच्या पेट्रोल-डिझेलचे दर

राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचे दर स्थिर आहेत. दिल्लीत पेट्रोल ९७.०१ रुपये प्रति लीटर तर डिझेल ८८.२७ रुपये प्रति लीटर आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर १११.६७ रुपये प्रति लीटर असून डिझेल ९५,८५ रुपये प्रति लीटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.३४ रुपयांनी विकत आहे. तर डिझेल ९१.४२ रुपये प्रति लीटर विकत आहे. तसेच आज चेन्नईत पेट्रोलचा दर १०२.९१ रुपये असून डिझेल ९२.९५ रुपये प्रति लीटर आहे.

एसएमएसच्या माध्यमातून जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही एसएमएसच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर जाऊन आरएसपी आणि तुमचा शहर कोड लिहून ९२२४९९२२४९ यानंबर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा असतो, जो तुम्हाला आयओसीएल वेबसाईटवर मिळेल.


हेही वाचा – 2 वर्षांनंतर कोरोना निर्बंधांपासून दिलासा!


 

First Published on: March 24, 2022 8:21 AM
Exit mobile version