अमेठीतून राहुल गांधी यांचा अर्ज दाखल

अमेठीतून राहुल गांधी यांचा अर्ज दाखल

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेशातील अमेठीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांनी आज, बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, रॉबर्ट वाड्रा, त्यांचा मुलगा रेहान, मुलगी मिराया आदी उपस्थित होते. कडक ऊन असूनही यावेळी काँग्रेसच्या शेकडो स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर अमेठी मतदारसंघात दोन तासांचा रोड शो करत त्यातून त्यांनी शक्तीप्रदर्शन केले आहे.

राहुल गांधी यांचा वायनाडमधून लढण्याचा निर्णय हा अमेठीच्या जनतेचा अपमान आहे, अशी टीका भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी गुरुवारी केली होती. तसेच राहुल हे अमेठीतूनही निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधात इराणी उभ्या आहेत. ‘राहुल यांचा गेल्या १५ वर्षांपासून अमेठी हा मतदारसंघ असतानाही ते आपल्या समर्थकांना सोडून अन्य मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. याचा अर्थ त्यांना अमेठीतून पाठिंबा नाही, असा होतो’, अशी टिप्पणी करपण्यात आली होती. अमेठीतील लोकांना गेली १५ वर्षे बेपत्ता खासदार सहन करावा लागला, अशी टीकाही त्यांनी केली.

वायनाड मतदारसंघातूनही निवडणूक लढवणार

काँग्रेस अध्यक्ष राहुल केरळमधील वायनाड मतदारसंघातूनही निवडणूक लढवणार आहेत. त्याकरता त्यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला होता. राहुल गांधी यांनी कलपेट्टा येथील वायनाड जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज भरला होता. तसेच ते केरळमध्ये रोड शो देखली केला होता. तसेच रोड शोच्या माध्यमातून राहुल गांधीनी शक्तीप्रदर्शन देखील केले आहे.

First Published on: April 10, 2019 1:36 PM
Exit mobile version