घरदेश-विदेशराहुल गांधी यांचा वायनाडमधील उमेदवारी अर्ज दाखल

राहुल गांधी यांचा वायनाडमधील उमेदवारी अर्ज दाखल

Subscribe

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी आज, गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. राहुल गांधी लोकसभा २०१९ मध्ये उत्तर प्रदेशातील अमेठी या मतदारसंघासोबतच केरळमधील वायनाड मतदारसंघातूनही निवडणूक लढवणार आहेत. त्याकरता आज ते अर्ज भरण्यासाठी केरळमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधीदेखील केरळमध्ये आल्या आहेत. राहुल गांधी यांनी आज सकाळी ११ वाजता कलपेट्टा येथील वायनाड जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज भरला. तसेच ते केरळमध्ये रोड शो देखली करणार आहेत. रोड शोच्या माध्यमातून राहुल गांधी शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत.

- Advertisement -

भाजपतर्फे तुषार वेल्लापल्ली रिंगणात

काँग्रेससाठी वायनाड जागा सुरक्षित मानली जात आहे. त्यासाठी राहुल गांधी येथून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाडमधून उमेदवारी जाहीर केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांच्याविरोधात केरळमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटकपक्ष असलेल्या भारत धर्मा जन सेनेचे अध्यक्ष तुषार वेल्लापल्ली यांना रिंगणात उतरविले आहे. वायनाड उत्तर केरळला लागून असून त्याच्या सीमा कर्नाटक आणि तमिळनाडूला लागून आहेत. वायनाड लोकसभा मतदार संघामध्ये वायनाड आणि मलप्पुरम जिल्ह्यातील ३-३ विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. कोझीकोडमधीलही एका विधानसभा मतदार संघाचाही वायनाड लोकसभा मतदार संघामध्ये समावेश होतो. या मतदारसंघात मुस्लिबहुल मतदारवर्ग अधिक आहे. या मतदार संघावर इंडियन यूनियन मुस्लिम लीगचेही चांगले प्राबल्य आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -