संजलि हत्याकांड: ‘लूजर’ म्हणाली म्हणून जाळले संजलिला

संजलि हत्याकांड: ‘लूजर’ म्हणाली म्हणून जाळले संजलिला

संजलि

आग्रामध्ये एका मुलीवर भरदिवसा पेट्रोल ओतून एका मुलीला पेटवून देण्यात आले. दहावीत शिकणाऱ्या या मुलीसोबत असे कोणी का केले असेल ? अशा चर्चा रंगत असताना आता पोलिसांनी या संदर्भात एक मोठा खुलासा केला आहे. संजलिला अन्य कोणी नाही तर तिच्याच मोठ्या काकाच्या मुलाने मारल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणात आणखी दोघांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून हे दोघेही संजलिचे नातेवाईक आहेत.

उदानी हत्याकांड बोलविता धनी तिसराच?

काय झाले त्या दिवशी ?

आग्रामधील लालऊ गावात ही घटना घडली आहे, संजलि हरेंद्र सिंह याटव यांची मुलगी असून ती १८ डिसेंबर रोजी दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी येत होती. त्यावेळी अज्ञातांनी तिच्यावर पेट्रोल टाकून जाळले. ज्यावेळी पोलिसांना ही माहिती मिळाली. त्यावेळी ती ७० टक्के भाजली होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण ती वाचू शकली नाही.

हिरे व्यापारी हत्याकांड प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक

काय आले पोलिस तपासात ?

संजलिची मृत्यूशी झुंज सुरु असतानाच तिचा चुलत भाऊ योगेशने संजलिला मारण्याचा प्लॅन केला होता. या मध्ये तिचे मामेभाऊ देखील सामील होते. योगेशने आपला गुन्हा समोर येऊ नये म्हणून आधीच विष खाऊन आत्महत्या केली. तर आकाश आणि विजय यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनीच हा सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. शिवाय संजलिच्या मेसेजमुळे दुखावलेलल्या योगेशबद्दही सांगितले.

नेमके प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेशने संजलि मॉडेल व्हावी यासाठी १.५ लाख रुपये खर्च केले होते. तो संजलिला आपल्या इशाऱ्यावर नाचवू पाहत होता. पण तिला मात्र मुक्तपणे विहार करायचे होते. त्याने तिला सायकल भेट म्हणून दिली. पण तिला योगेशने काहीही दिलेले संजलिला पटत नव्हते. त्यामुळे तिने त्याच्याशी बोलणे सोडून दिले होते. नोव्हेंबरमध्ये संजलिच्या वडिलांवर हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला योगेशने केला असेल असा संशय तिला होता. त्यामुळे तिने त्याला मेसेज करुन ‘लूजर’ असे म्हटले होते. तो राग मनात ठेवून त्याने तिला मारायचे षडयंत्र रचले. यात प्लॅनमध्ये त्याने तिच्या मामेभावालाही सामील करुन घेतले. त्यांना १५-१५ हजार देण्याचे आमीष देखील योगेशने दिले.त्यानुसार घटनेच्या दिवशी ते संजलिला मारण्यासाठी निघाले.

सीसीटीव्हीमध्ये झाले कैद ?

सीसीटीव्ही फुटेजमध्ये संजलि शाळेतून सुटल्यानंतर सायकलमधून जाताना दिसत आहे. तिच्या मागे योगेश,आकाश आणि विजयदेखील दिसत आहे. त्यांनी संजलिला मारण्याचा प्लॅन आधीच तयार केलेला होता. कारण तिला आग लावण्यासाठी त्यांनी आधीच पेट्रोल आणि लाईटर आणले होते. यासाठी वापरण्यात आलेले लाईटरही वेगळे होते. तिला आग लावल्यानंतर आगीच्या झळा अंगाला लागू नये म्हणून मोठे लाईटर वापरण्यात आले होते.

First Published on: December 25, 2018 9:22 PM
Exit mobile version