एसबीआयची ‘ही’ सेवा करणार मालामाल

एसबीआयची ‘ही’ सेवा करणार मालामाल

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बॅंक म्हणून ओळख असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने आयएमपीएस ही सेवा मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत आयएमपीएस सेवेसाठी ग्राहकांना शुल्क द्यावे लागत होते. १ ऑगस्टपासून मात्र एसबीआयच्या ग्राहकांना आयएमपीएस ही सेवा मोफत होणार नाही.

हेही वाचा – वैतागलेल्या यूजर्सना दिलासा; रात्रभर डाऊन असलेले ट्विटर सुरू

यापूर्वी एसबीआयने १ जुलैपासून योनो, इंटरनेट बँकींग आणि मोबाईल बँकींगच्या ग्राहकांसाठी आरटीजीएस आणि एनईएफटी शुल्क घेणे बंद केले होते. आता बँकेतर्फे योनो, इंटरनेट बँकींग आणि मोबाईल बँकींगच्या ग्राहकांसाठी आयएमपीएस शुल्कसुद्धा १ ऑगस्टपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ मार्च २०१९ पर्यंत एसबीआयचे ६ कोटी ग्राहक इंटरनेट बँकींगचा लाभ घेत होते. तर १.४१ कोटी ग्राहक मोबाईल बँकींगचा वापर करत होते. तर एसबीआयच्या योनो या डिजीटल सेवेचा जवळपास १ कोटी ग्राहक वापर करत होते. बँकेच्या म्हणण्यानुसार एनइएफटी, आयएमपीएस आणि आरटीजीएस शुल्क बंद केल्यास डिजीटल व्यवहार करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वाढ होईल. याव्यतिरिक्त बँकेने बँक शाखेच्या नेटवर्कींगमधून आरटीजीएस आणि एनइएफटी करणाऱ्या ग्राहकांच्या शुल्कात २० टक्के कपात केली आहे.

काय आहे आयएमपीएस सेवा

या सेवेद्वारे तुम्ही २४*७ फंड ट्रान्सफर करू शकता.
जर तुम्ही कोण्या व्यक्तीला आयएमपीएसद्वारे फंड ट्रान्सफर केला असेल तर तो फंड त्याच वेळी त्या खातेधारकाच्या खात्यात जमा होईल.
सुट्टीच्या दिवशीही ग्राहकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

First Published on: July 12, 2019 6:23 PM
Exit mobile version