वैतागलेल्या यूजर्सना दिलासा; रात्रभर डाऊन असलेले ट्विटर सुरू

ट्विटर का ठप्प झाले होते ?, याचे नेमके कारण कंपनीने अद्याप स्पष्ट केलेले नाही.

ट्वीटर

सोशल मीडियातील सर्वाधिक वापरले जाणारे आणि तेवढेच लोकप्रिय असणारे ट्विटर अकाऊंट काल रात्रभर बंद असल्याने जगभरातील ट्विटर यूजर्स रात्रभर हैरान झाले होते. कोणतेही ट्विट करता येत नसल्याने आणि कोणाचेच ट्विट येत नसल्याने ट्विटर वापरणाऱ्या युजर्सना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

ट्विटर सुरू झाल्याने यूजर्सना दिलासा

काल रात्रभर बंद असलेले हे सोशल मीडियातील ट्विटर आज पहाटे ५ ते ६ च्या सुमारास सुरू झाल्याने यूजर्सना दिलासा मिळाला आहे. मात्र ट्विटर का ठप्प झाले होते ?, याचे नेमके कारण कंपनीने अद्याप स्पष्ट केलेले नाही.

ट्विटर कंपनीविरोधात यूजर्सचा संताप

यामुळे गुरूवारी रात्री ट्विटरची सेवा ठप्प झाल्यावर ट्विटर यूजर्सनी आपला संताप फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून त्यावर प्रतिक्रिया देत व्यक्त केला. यासह ट्विटर कंपनीविरोधात संतापही व्यक्त करत ट्विटर सुरू झाल्यानंतरही ट्विटर का बंद होतं? याबाबतचे प्रश्न उपस्थित केले आहे.

ट्विटर यूजर्सनी ट्विटर बंद झाल्याचे मीम्स देखील चांगलेच व्हायरल केले. या गंमतीशीर मीम्सला ट्विटर कंपनीनेही मिश्कील प्रतिक्रिया दिल्या आहे. तर ‘आम्हाला मिस केलंत का?’ असा मिश्किल प्रश्न ट्विटरने विचारला. त्यावर यूजर्सनेही फनी मीम्स व्हायरल करून ट्विटरला उत्तर दिले आहे.

या प्रकारानंतर कंपनीचे सीईओ जॅक यांनीही ट्विट केलं. ‘ट्विटर अकाउंट डाऊन झालं होतं. मात्र हळूहळू ट्विटर सेवा पूर्वपदावर येत आहे. त्याबद्दल दिलगीर आहोत. आमच्या ऑपरेशन्स आणि इंजिनीयरिंग टीमने प्रचंड मेहनत घेऊन ट्विटर पुन्हा पूर्वपदावर आणलं. त्यांचे आभार,’ असं जॅक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. मात्र ट्विटर अकाउंट का डाऊन झालं हे मात्र कोणताही खुलासा केला नाही.