दहशतवादाला फूस देणाऱ्यांविरोधात कारवाई व्हावी – सुषमा स्वराज

दहशतवादाला फूस देणाऱ्यांविरोधात कारवाई व्हावी – सुषमा स्वराज

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज

देशाच्या परराष्ट्रीय मंत्री सुषमा स्वराज सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्या चीन दौऱ्यावर होत्या. यानंतर आज त्या युएई या देशात गेल्या आहेत. युएईमध्ये आज जगभरातील ५७ इस्लामिक देशांची OIC (ऑर्गनाइजेश ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन) बैठक आहे. या बैठकीसाठी भारताला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण देण्यात आलं होते. विशेष म्हणजे OIC ची स्थापना पाकिस्तानने केली आहे. त्यामुळे या बैठकीत भारताला आमंत्रण देऊ नये, अशी विनंती पाकिस्तानने OIC ला केली होती. परंतु, OIC च्या कमिटीने पाकिस्तानच्या विनंतीला न जुमानता भारताला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण दिले आहे. या बैठकीसाठी सुषमा स्वराज युएईला गेल्या आहेत. बैठकीला बोलावल्याबद्दल स्वराज यांनी युएईचा आभार मानले आहे.

काय म्हणाल्या सुषमा स्वराज?

सुषमा स्वराज म्हणाल्या की, अरेबियन देशांशी भारताचे दृढ संबंध आहेत. मानवतेचे मूल्य जोपासात आपण एकत्र काम करत आहोत. भारताची अर्थव्यवस्था वाढत आहे. त्यानुसार इतर देशांसोबत असणारे संबंधही वाढत आहेत. सध्या भारत दहशतवादाशी लढत आहे. दिवसेंदिवस हा दहशतवाद वाढत आहे. त्याचबरोबर उत्तर पूर्व देशांमध्ये सुरु असणारा दहशतवाद हा नव्या स्तरावर आहे. ही लढाई कुठलाई धर्माच्या विरोधात नसून दहशतवादाच्या विरोधात आहे. अल्लाह म्हणजे शांती आहे. आतंकवादाला लपवणारे आणि फूस देणाऱ्यांच्या विरोधात कारवाई व्हायला हवी. अतिरेकी संघटनेचा फंड बंद व्हायला हवा. इस्लाम शांततेची शिकवण देतो. संस्कृतिची देवाणघेवाण व्हायला हवी. खेरदीच्या बाबतीत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.


हेही वाचा –कुपवाड्यात जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

First Published on: March 1, 2019 2:37 PM
Exit mobile version