स्विगीमध्येही होणार मोठी नोकरकपात?, देशभरातील कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

स्विगीमध्येही होणार मोठी नोकरकपात?, देशभरातील कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

मुंबई – जगभरात सर्वच क्षेत्रात नोकरकपात होत असताना आता फूड डिलिव्हरी अॅप स्विगीनेही नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास २५० कर्मचाऱ्यांना स्विगी नारळ देणार असल्याचे वृत्त इकोनॉमिक टाइम्स या वृत्तपत्राने दिले आहे. काही दिवसांपूर्वी झोमॅटो या फूड डिलिव्हरी करणाऱ्या अॅपमधूनही मोठ्या प्रमाणात नोकर कपात करण्यात आली होती. (After Zomato, Swiggy could lay off 250 employees or 3-5% of its workforce)

हेही वाचा – नोटाबंदीसंदर्भातील याचिकांवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला, RBI ला फटकारले

गेल्या काही दिवसांपासून जगभरात विविध क्षेत्रात नोकरकपात केली आहे. खर्च कमी करून नफा वाढवण्याकरता कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा ट्रेंड जगभरातील कंपन्यांमध्ये निर्माण झाल्याचं चित्र आहे. ट्विटर, मेटा, अॅमेझॉनसारख्या बड्या कंपन्यांमध्येही कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं आहे. तर, झोमॅटो आणि स्विगीसारख्या कंपन्यांनीही त्याच पावलावर पाऊल ठेवत कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

हेही वाचा – महागाईचा फटका! भारताचा वृद्धिदर निम्म्याने घसरला, कृषीक्षेत्र मात्र तेजीत

माध्यमांतून समोर आलेल्या वृत्तानुसार, डिसेंबर महिन्यात स्विगी कंपनी नोकरकपात करू शकते. २५० कर्मचारी किंवा कंपनीतील ३ ते ५ टक्के कर्मचाऱ्यांना कंपनी नोकरीवरून काढून शकते. यामुळे देशभरातील स्विगीतील कर्मचारी आता भितीच्या छत्रछायेखाली आहेत.

स्विगीच्या ग्राहक सेवा विभाग, तंत्रज्ञान आणि उत्पादन विभागात ही नोकर कपात होणार असल्याचे वृत्त आहे. कमीत कमी कर्मचाऱ्यांमध्ये चोख काम करण्यासाठी स्विगीकडून योजना आखली जात आहे.

हेही वाचा – धक्कादायक! जगभरात १.३७ लाख कर्मचाऱ्यांना नारळ, ‘या’ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कपात

इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीतील कर्मचाऱ्यांनी स्विगीत कर्मचारी कपात होणार असल्याचं सांगितलं तरी स्विगीने हे वृत्त फेटाळले आहे. या महिन्यात किंवा येत्या महिन्यात कर्मचारी कपात होण्याचा निर्णय घेण्यात आला नसल्याचं स्विगीने म्हटलं आहे.

First Published on: December 8, 2022 10:46 AM
Exit mobile version