Facebook bans Taliban content : तालिबान्यांचे अकाऊंट ब्लॉकिंगनंतर पहिली प्रतिक्रिया

Facebook bans Taliban content : तालिबान्यांचे अकाऊंट ब्लॉकिंगनंतर पहिली प्रतिक्रिया

अफगाणिस्तानात सोशल मिडियावर बंधने आणल्यानंतर तालिबानने सोशल मिडिया जायंट्स फेसबुकवर निशाणा साधला आहे. अफगाणिस्तानात स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेतल्यामुळे तालिबान्यांनी फेसबुकच्या या कारवाईबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. तालिबानच्या प्रवक्त्याने एका व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत फेसबुकच्या कारवाईचाही उल्लेख झाला. त्यामध्ये स्वातंत्र्य हिरावणाऱ्या फेसबुक कंपनीलाच प्रश्न उपस्थित केले जाणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य देणाऱ्या फेसबुकच्या या कारवाईवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. तालिबानचे प्रवक्ता सुहेल शाहीन हे पत्रकार परिषदेत बोलत होते. (Taliban spokesperson reaction on Facebook content ban)

फेसबुकने याआधीच स्पष्ट केले आहे की, अमेरिकन कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांचे सोशल मिडिया फ्लॅटफॉर्म हे बॅन करण्यात येत आहे. बंदी असणारे कंटेन्ट हे सोशल मिडियावर प्रसारित होत असल्यानेच फेसबुकसह वॉट्स एपही बॅन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तालिबान ही दहशतवादी संघटना असल्यानेच त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येत आहे. फेसबुकने वॉट्स एप हॉटलाईन तालिबानही बंद केली आहे. हिंसा तसेच लुटमारीच्या प्रकारामुळेच ही बंदी करण्यात आली आहे.

ज्या फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून तालिबान्यांचे अधिकृत अकाऊंट्स म्हणूनच चर्चा होती, त्या अकाऊंट्सचाही शोध फेसबुकमार्फत सुरू आहे. अमेरिकन यंत्रणांच्या माध्यमातून अफगाणिस्तानातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. त्यामध्ये फेसबुकवर येणाऱ्या माहितीचाही आढावा घेण्यात येत आहे. याआधीच फेसबुकने तालिबान्यांना सपोर्ट करणारे सर्व प्रकारचे कंटेन्ट ब्लॉक करत असल्याचे जाहीर केले आहे. जी माहिती दसहशतवादी संघटनेला सपोर्ट करणारा सर्व मजकुरही ब्लॉक करण्यात येत आहे. फेसबुकने हा सर्व डेटा ट्रॅक करण्यासाठी एक डेडिकेटेड टीम नेमली आहे. ज्यामुळे तालिबानच्या समर्थनार्थ लिहिणारे, पोस्ट होणारा सर्व प्रकारचा मजकुर हा ब्लॉक करण्यात येणार आहे. तालिबानच्या संघटनेशी संबंधित किंवा त्यांच्याशी संलग्न अशी सर्व फेसबुक अकाऊंट ब्लॉक करण्याचा निर्णय फेसबुकने घेतला असल्याचे फेसबुकच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले होते.


हे ही वाचा – अफगाणिस्तानातील भारतीय दूतवासाचे संरक्षण करणाऱ्या माया, बॉबी आणि रुबी श्वानांची घरवापसी


 

First Published on: August 18, 2021 4:31 PM
Exit mobile version