घरदेश-विदेशअफगाणिस्तानातील भारतीय दूतवासाचे संरक्षण करणाऱ्या माया, बॉबी आणि रुबी श्वानांची घरवापसी

अफगाणिस्तानातील भारतीय दूतवासाचे संरक्षण करणाऱ्या माया, बॉबी आणि रुबी श्वानांची घरवापसी

Subscribe

हे तिनही श्वान भारतीय भूमीवर पोहोचल्यानंतर खूप आनंदीत दिसत होते.

अफगाणिस्ताण (afghanistan) मधील भारतीय दूतवासांच्या सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आलेल्या विशेष जातीच्या तिन श्वानांना भारतामध्ये परत आणण्यात आलं आहे. माया,बॉबी आणि रुबी अशा तिन श्वानांना अफगाणिस्तानमध्ये भारत तिब्बल सीमा पोलिसांच्या  (ITBP) पथकासोबत भारतीय दूतावासाच्या पहाऱ्यासाठी पथकासह तैनात करण्यात आले होते.  तेथे अनेकदा या श्वानांनी स्फोटके शोधण्यात मदत केली होती. मंगळवारी जेव्हा भारतीय वायुसेनेच्या C- 17 विमानामधून भारतीय नागरिक काबुल (kabul) मधून भारतात दाखल झाले तेव्हा या नागरिकांमध्ये माया, बॉबी आणि रुबी यांची देखील भारतात घरवापसी करण्यात आली. सध्या या तिनही श्वानांना ITBP यांच्या छावणीत ठेवण्यात आले आहे.(national itbp dogs who protected indian embassy in kabul returns from afghanistan)

काबुलमध्ये माया,बॉबी आणि रूबी यांची देखरेख आणि ट्रेनिंग दररोज हेड कॉन्सेटबल किशन कुमार तसेच हेड कॉन्स्टेबल बिजेंदर सिंह आणि अतुल कुमार यांच्या देखरेखी अतर्गंत करण्यात येत असे. हे तिनही श्वानांनी काबूलमध्ये भारतीय दूतावासांना सुरक्षित ठेवण्याच्या महत्वपुर्ण कार्यात महत्वपूर्ण योगदान देत असे. आयटीबीपीने सांगितले की या तिघांनी काबूलमधील भारतीय दूतावासाजवळ अनेकदा स्फोटक ओळखले आणि भारतीय दूतावासातील कर्मचारी आणि अफगाण कर्मचाऱ्यांचे  यांचे प्राण वाचवले. आयटीबीपीने सांगितले की तिन्ही श्वानांना हरियाणातील पंचकुला येथील डॉग ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते. आयटीबीपीच्या म्हणण्यानुसार, हे तिनही श्वान भारतीय भूमीवर पोहोचल्यानंतर खूप आनंदीत दिसत होते.

- Advertisement -

हे हि वाचा – Viral Video: ‘माझे कपडे फाडले अन् हवेत भिरकावलं’; लाहोरच्या टिकटॉकरवर स्वातंत्र्यदिनी ४०० जणांचा हल्ला

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -