मोदींवर पुन्हा वैयक्तिक टीका; ‘देश तुमच्या वडिलांचा जहागीर नाही’

मोदींवर पुन्हा वैयक्तिक टीका; ‘देश तुमच्या वडिलांचा जहागीर नाही’

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांनी प्रचारसभांमध्ये वैयक्तिक टीकेचा सूर लावला आहे. निवडणूक प्रचारसभांमध्ये नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जातात. परंतु, हे आरोप-प्रत्यारोप जेव्हा वैयक्तिक पातळीवर येऊन ठेपतात तेव्हा देशातील राजकारणाने खालची पातळी गाठली असल्याचे सिद्ध होते. सध्या देशात असेच राजकारण सुरु आहे. राजस्थान आणि मिझोरामच्या विधानसभा निवडणूकीनंतर आता तेलंगणाची निवडणूक येत्या ७ डिसेंबरला होणार आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या एका प्रचारसभेत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मोदींवर टीकास्त्रे सोडले आहे. ‘भारत देश हा तुमच्या आजोबा किंवा वडिलांची जहागीर नाही’, अशा शब्दात राव यांनी मोदींची टीका केली आहे.

हेही वाचा – मुत्तेमवार यांनी केले मोदींच्या वडिलांवर वादग्रस्त विधान

…म्हणून राव यांची मोदींवर टीका

तेलंगणातील आदिवासी आणि मुस्लीम समाजाचे आरक्षण वाढवून देण्याची मागणी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली होती. परंतु, त्यांची ही मागणी पुर्ण न झाल्याने राव यांनी मोदींवर टीका केली. यावेळी आपण दिल्लीला फक्त आरक्षणाच्या प्रस्तावासाठी गेलो नव्हतो, तो प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी गेलो होतो. याअगोदर केंद्र सरकारला यासंबंधी ३० पत्रेही पाठवली आहेत. आपल्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांना दिल्ली भेटून आरक्षणाचा प्रस्ताव मान्य करावा अशी विनंती केली होती, असे राव यांनी सांगितले. परंतु, मोदी यांनी हा प्रस्ताव मंजूर केला नाही. शिवाय, हा प्रस्ताव आपण मंजूर करणार नाहीत आणि दूसऱ्या कुणालाही मंजूर करु देणार नाहीत, असे मोदी सरकारकडून सांगण्यात येत असल्याचे राव यांनी सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या के. चंद्रशेखर राव यांनी मोदींवर वादग्रस्त टीका केली.

हेही वाचा – ३० वर्षांपूर्वी निधन झालेल्या माझ्या वडिलांना राजकारणात कशाला खेचता? – मोदी

याअगोदरही मोदींवर झाली आहे अशी टीका

याअगोदरही कॉंग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार यांनी मोदींच्या वडिलांसंबंधी वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी म्हटले होते की, राहुल गांधी यांच्या पुर्वजांविषयी सगळ्यांना ठाऊक आहे. परंतु, नरेंद्र मोदी यांच्या वडिलांना कोण ओळखते? त्यानंतर मोदी यांनी प्रत्युत्तर देताना ३० वर्षांपूर्वी निधन झालेल्या माझ्या वडिलांना राजकारणात का खेचता? असा प्रश्न विचारला होता. त्याचबरोबर दूरमध्ये गुरुवार, २२ नोव्हेंबर रोजी काँग्रेसची जाहीर सभा झाली होती. त्यावेळी पंतप्रधान मोदी ‘अशुभ’ असल्याची टिप्पणी काँग्रेस नेते राज बब्बर यांनी केली होती. मोदींच्या आईलाही राजकारणात खेचलं होतं. ‘डॉलरच्या तुलनेत रुपया इतका पडतोय की तो पंतप्रधानांच्या (मनमोहन सिंह) वयाच्या जवळ पोहोचला आहे, अशी टीका नरेंद्र मोदी करायचे. पण, आता तर रुपया इतका घसरलाय की तो तुमच्या पूज्य आईच्या वयाच्या जवळ पोहोचलाय, असं विधान राज बब्बर यांनी केलं होतं. यानंतर आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मोदींवर वैयक्तिक टीका केली आहे.


हेही वाचा – माझ्या आईला राजकारणात का खेचता – नरेंद्र मोदी

First Published on: November 29, 2018 11:39 AM
Exit mobile version