घरदेश-विदेशमुत्तेमवार यांनी केले मोदींच्या वडिलांवर वादग्रस्त विधान

मुत्तेमवार यांनी केले मोदींच्या वडिलांवर वादग्रस्त विधान

Subscribe

एका सभेत आपल्या भाषणात मुत्तेमवार यांनी मोदींच्या वडिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भाजपच्या आणि मोदी समर्थकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल करत मुत्तेमवार यांच्यावर निशाना साधला आहे.

कॉंग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी एका सभेत आपल्या भाषणात हे वक्तव्य केले. राहुल गांधी यांच्या पुर्वजांविषयी सगळ्यांना ठाऊक आहे. परंतु, नरेंद्र मोदी यांच्या वडिलांना कोण ओळखते? असे वक्तव्य त्यांनी केले आहे. मोदींविषयी केलेल्या त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. भाजपच्या आणि मोदी समर्थकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल करत मुत्तेमवार यांच्यावर निशाना साधला आहे. त्यामुळे मुत्तेमवार यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. याअगोदरही कॉंग्रेसचे नेते राज बब्बर यांनी मोदींच्या आईविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, रुपयांचे अवमुल्य होत असून त्याचे मूल्य मोदी यांच्या आईच्या वयाच्या जवळपास पोहोचले आहे.

हेही वाचा – माझ्या आईला राजकारणात का खेचता – नरेंद्र मोदी

- Advertisement -

काय म्हणाले मुत्तेमवार?

विलास मुत्तेमवार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. त्यांनी त्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, राहुल गांधी यांना देशाचे सर्व नागरिक ओळखतात. त्यांचे वडिल राजीव गांधी आणि आई सोनिया गांधी आणि त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांना सर्व लोक ओळखतात. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांना कोण ओळखते? वडिलांच्या वडिलांना कोण ओळखते? इथे तर वडिलांना कोण ओळखत नाही. मग त्यांच्या वडिलांचा प्रश्नच येत नाही, असे मुत्तेमवार म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – वादग्रस्त विधानावरुन केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्याविरोधात तक्रार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -