भयंकर, हत्तीणीनंतर गर्भवती गायीला खाऊ घातले फटाके

भयंकर, हत्तीणीनंतर गर्भवती गायीला खाऊ घातले फटाके

केरळच्या मलप्पुरममध्ये अननसातून फटाके खायला दिल्याने गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना हिमाचल प्रदेशातून असंच धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका गर्भवती गाईला फटाक्यांचा बॉल बनवून खायला दिला. फटाके तोंडात फुटल्याने गायीच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली आहे. हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर जिल्ह्यातील झांडुटा भागातली घटना आहे. गायीच्या मालकाने या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर टाकला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे.

गाईचा मालक गुर्दील सिंगने त्याचे शेजारी नंदलाल यांच्यावर मुद्दामहून गाईला इजा पोहोचवली, असा आरोप केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर नंदलाल फरार असल्याचं गुर्दील यांनी सांगितलं आहे. गुर्दील सिंगने गाईचा व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. ही घटना दहा दिवसांपूर्वीची आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी मलप्पुरममध्ये, एका गर्भवती हत्तीणीला क्रुर लोकांनी फटाके भरलेले अननस खायला दिले होते. अननस खाल्ल्यानंतर हत्तीणीचा तडफडून मृत्यू झाला होता. यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. कलाकारांनी देखील या घटनेचा निषेध नोंदवला होता. दरम्यान, याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.


हेही वाचा – चीनला हरवण्यासाठी चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालणे आवश्यक – बाबा रामदेव


 

First Published on: June 6, 2020 4:36 PM
Exit mobile version