घरदेश-विदेशचीनला हरवण्यासाठी चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालणे आवश्यक - बाबा रामदेव

चीनला हरवण्यासाठी चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालणे आवश्यक – बाबा रामदेव

Subscribe

चीनला हरवण्यासाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सर्व स्तरांवर चीनवर बहिष्कार टाकावा लागेल, असं बाबा रामदेव म्हणाले.

भारत-चीन सीमावादावरुन देशातील वातावरण चांगलच तापलं आहे. चीनवर मात करायची असेल तर चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालायला हवा असं सोनम वांगचूक यांनी नुकतंच म्हटलं होतं. दरम्यान, आता योगगुरू बाबा रामदेव यांनी देखील चीनला हरवण्यासाठी त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार घालणं आवश्यक आहे, असं म्हटलं आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सर्व स्तरांवर चीनवर बहिष्कार टाकावा लागेल, असं बाबा रामदेव म्हणाले.

आपली सेना देशाच्या सीमांचं रक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. शस्त्रापेक्षा चीनला पराभूत करण्यासाठी त्याच्या वस्तूंवर बहिष्कार घातला पाहिजे. कारण चीन आपल्या देशात १५ ते २० लाख कोटींचा व्यवसाय करतो. टॉयलेटच्या कमोडपासून ते खेळण्यापर्यंत चीनमधून बरीच उत्पादने आज देशात येत आहेत. या सगळ्या वस्तूंवर बहिष्कार घालायला हवा, असं बाबा रामदेव म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – सरकार देतंय स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी


बाबा रामदेव म्हणाले की चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासाठी मोठे ठराव समंत करावे लागतील. मी गेल्या तीन दशकांत कोणतेही चिनी उत्पादन वापरलेलं नाही. जर चीनला धडा शिकवायचा असेल तर प्रत्येक भारतीयांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा संकल्प केला पाहिजे. चीनला धडा शिकवण्याचा हा उत्तम मार्ग आहे. बाबा रामदेव म्हणाले की, जवाहरलाल नेहरूंच्या काळापासून भारत-चिनी भाई-भाईचा नारा देऊन चीन आपल्याला लुटत आहे. अशा परिस्थितीत केवळ चिनी उत्पादनांवर बहिष्कारच नाही तर चीनविरोधात द्वेषाचे वातावरण देखील निर्माण करावं लागेल.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -