शत्रूंच्या ड्रोनविरोधात कारवाईसाठी गरुडांना प्रशिक्षण, भारतीय लष्कराची नवी शक्कल

शत्रूंच्या ड्रोनविरोधात कारवाईसाठी गरुडांना प्रशिक्षण, भारतीय लष्कराची नवी शक्कल

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून भारतीय हद्दीत ड्रोनच्या घिरट्या वाढत आहेत. शत्रू राष्ट्रांकडून भारतात देखरेख करण्यासाठी या ड्रोन्सचा वापर केला जातो. या ड्रोनचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराने नवी युक्ती लढवली आहे. ड्रोनप्रतिबंधक कारवायांसाठी भारतीय लष्कराने गरुड पक्षाला प्रशिक्षित केलं आहे. प्रशिक्षित गरुड पक्षी शत्रूंच्या ड्रोनवर हल्ला करून ड्रोन पाडतील. भारतीय सेनाच्या मेरठ येथील रीमाऊंट वेटरिनरी कोरमध्ये अशा गरुडांना ट्रेन केलं जातंय. उत्तराखंडच्या औलीमध्ये भारतीय सेना आणि अमेरिकी सेनेकडून सुरू असलेल्या युद्धाभ्यासाअंतर्गत हे प्रशिक्षण देण्यात येतंय.

हेही वाचा – ‘या’ शिफारशीमुळे नवज्योतसिंग सिद्धू यांची तुरुंगातून होणार सुटका?

अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाभ्यासादरम्यान प्रशिक्षित गरुड आणि प्रशिक्षित श्वान मिळून ड्रोनविरोधात कसा सामना करतात याचं संशोधन सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मेरठच्या रीमाऊंट वेटरिनरी कोरमध्ये गरुडांना प्रशिक्षण देण्याचं काम सुरू आहे. त्यांचं प्रशिक्षण आता पूर्ण झालं आहे. ते आता त्यांच्या मिशनसाठी तयार आहेत. आपल्या मजबूत पंजा आणि पंखांचा वापर करून आपल्या शत्रूंवर वार करणे हा गरुडाचा विशेष गुण असतो. त्यामुळे गरुड पक्षी नैसर्गिकरित्याच ड्रोनविरोधी काम करू शकतात.

ड्रोनविरोधी काम कसं असेल?

First Published on: November 29, 2022 3:01 PM
Exit mobile version