घरताज्या घडामोडी'या' शिफारशीमुळे नवज्योतसिंग सिद्धू यांची तुरुंगातून होणार सुटका?

‘या’ शिफारशीमुळे नवज्योतसिंग सिद्धू यांची तुरुंगातून होणार सुटका?

Subscribe

पंजाबचे माजी मंत्री, काँग्रेसचे पंजाबचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू पटियाला तुरुंगात आहेत. ३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. मात्र आता लवकरच नवज्योतसिंग सिद्धूची तरुंगातून सुटका होण्याची शक्यता वर्चवली जात आहे.

पंजाबचे माजी मंत्री, काँग्रेसचे पंजाबचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू पटियाला तुरुंगात आहेत. ३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. मात्र आता लवकरच नवज्योतसिंग सिद्धूची तरुंगातून सुटका होण्याची शक्यता वर्चवली जात आहे. चांगल्या वर्तनामुळे नवज्योतसिंग सिद्धू यांची प्रजासत्ताक दिनानिमित्त तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. (navjot singh sidhu may get a big relief from punishment)

नवज्योतसिंग सिद्धू यांनी आतापर्यंत साडे सहा महिन्यांची शिक्षा भोगली आहे. नियमानुसार, सिद्धूला दिलासा मिळण्यासाठी सर्व गोष्टी त्यांच्या बाजूने आहेत. तसेच, प्रजासत्ताक दिनानिमित्त चांगल्या वर्तनामुळे ज्या कैद्यांची तुरुंगातून सुटका होणार त्या कैद्यांची नावे पंजाब सरकारला तुरुंग प्रशासनाने पाठवली आहेत. त्या कैद्यांच्या यादीत सिद्धू यांचेही नाव आहे.

- Advertisement -

दरम्यान, नवज्योतसिंग सिद्धू यांचे तुरुंगातील वर्तन चांगले असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर कारकून म्हणून कारागृहाचे काम सोपविण्यात आले. तुरुंगात नियम असतानाही त्यांनी सुटीही घेतली नाही.

नेमके प्रकरण काय ?

- Advertisement -
  • 27 डिसेंबर 1988 च्या संध्याकाळी सिद्धू हे त्यांचे मित्र रुपिंदर सिंह संधू यांच्यासोबत पटियालाच्या शेरावले गेट मार्केटमध्ये पोहोचले. हे ठिकाण त्यांच्या घरापासून दीड किलोमीटर अंतरावर आहे. त्यावेळी सिद्धू हे क्रिकेटपटू होते. त्यावेळी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला वर्षभरापूर्वीच सुरुवात झाली होती.
  • या मार्केटमध्ये कार पार्किंगवरून 65 वर्षीय गुरनाम सिंग यांच्याशी त्यांचा वाद झाला. त्यानंतर हे प्रकरण हाणामारीपर्यंत गेले होते. त्यावेळी सिद्धूने गुरनाम सिंगला गुडघ्याने मारत खाली पाडले होते. त्यानंतर गुरनाम सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. गुरनाम सिंग यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा अहवाल आला.
  • त्याच दिवशी कोतवाली पोलिस ठाण्यात सिद्धू आणि त्यांचा मित्र रुपिंदर यांच्याविरुद्ध निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सत्र न्यायालयात खटला चालला. 1999 मध्ये सत्र न्यायालयाने हा खटला फेटाळून लावला. 2002 मध्ये पंजाब सरकारने सिद्धूविरोधात उच्च न्यायालयात अपील केले होते.
  • दरम्यान, सिद्धू यांनी राजकारणात प्रवेश केला. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अमृतसरमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली.
  • डिसेंबर 2006 रोजी उच्च न्यायालयाचा निर्णय आला. हायकोर्टाने सिद्धू आणि संधू यांना दोषी ठरवून ३-३ वर्षांची शिक्षा सुनावली. यासोबतच एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. सिद्धू यांनी लोकसभेचा राजीनामा दिला.
  • 2006 मध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांनी सिद्धू यांच्या वतीने खटला लढवला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.
  • 15 मे 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्याला कलम 323 अंतर्गत दोषी ठरवले. परंतु दोषी मनुष्यवधा (304) अंतर्गत दोषी आढळले नाही. यामध्ये सिद्धूला दंड ठोठावल्यानंतर सोडून देण्यात आले.
  • 12 सप्टेंबर 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विलोकन याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली. 25 मार्च 2022 रोजी न्यायालयाने पुनर्विचार याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता.
  • 19 मे 2022 रोजी सुप्रीम कोर्टाने नवज्योत सिंग सिद्धूला एक वर्षाची शिक्षा सुनावली.

हेही वाचा – 6,6,6,6,6,6,6.., ऋतुराज गायकवाडने एकाच षटकात ठोकले 7 षटकार; रचला इतिहास

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -