मुख्तार अब्बास नक्वी यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

मुख्तार अब्बास नक्वी यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्तार अब्बास नक्वी यांचे कौतुक केले होते. यावेळी मोदी देशाच्या विकासात मुख्तार अब्बास नक्वी यांचे योगदान असल्याचे म्हटले होते. मात्र नक्की यांचा उद्या राज्यसभा खासदार म्हणून शेवटचा दिवस आहे.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर नक्वी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये कोण-कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आले नाही. मात्र यादरम्यान नक्वी यांच्या भविष्यातील भूमिकेबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीत भाजपने नक्वी यांना उमेदवारी दिली नाही. तेव्हापासून पक्षाकडून त्यांना नवीन भूमिका दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, एनडीएकडून मुख्तार अब्बास नक्वी यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली जाऊ शकते, नक्वी हे केंद्र सरकारमध्ये अल्पसंख्याक मंत्री होते, तसेच ते राज्यसभेत भाजप संसदीय पक्षाचे उपनेतेही होते.

मंत्री आरसीपी सिंह यांचाही जेडीयू कोट्यातून राजीनामा

मुख्तार अब्बास नक्वी यांच्यासह केंद्र सरकारमधील मंत्री आरसीपी सिंग यांनीही जनता दल युनायटेडच्या कोट्यातून राजीनामा दिला आहे. जेडीयूनेही त्यांना राज्यसभेची पुढील टर्म दिलेली नाही. आरसीपी सिंह यांचा राज्यसभा खासदार म्हणून गुरुवारी शेवटचा दिवस आहे.


Dolo-650 औषध बनवणाऱ्या कंपनीवर आयकर विभागाची धाड; कर चुकवेगिरीमुळे कारवाई

First Published on: July 6, 2022 5:30 PM
Exit mobile version