UPSC EPFO EXAM 2021: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यूपीएससी ईपीएफओच्या परीक्षा स्थगित

UPSC EPFO EXAM 2021: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यूपीएससी ईपीएफओच्या परीक्षा स्थगित

UPSC EPFO EXAM 2021: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यूपीएससी ईपीएफओच्या परीक्षा स्थगित

देशात कोरोना हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. देशात UPSC च्या माध्यामातून होणारी EPFO ( UPSC EPFO EXAM 2021) परीक्षाही स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ९ मे रोजी ही UPSC EPFO ची परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र आता परीक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. कर्मचारी भविष्य निधी संगठनेसाठी केंद्रिय सेवा आरोग म्हणजेच UPSC कडून इनफोर्समेंट अधिकारी आणि लेखा अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाच्या परीक्षा घेतल्या केल्या जातात. या परीक्षेच्या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे परीक्षा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

UPSC ने सुचनांनुसार, यूपीएसससी ईपीएफओ २०२०-२१ ( UPSC EPFO EXAM 2021) परीक्षा ९ मे २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळत होणार होती. उमेदवारांना सकाळी ९:५० वाजता परीक्षा केंद्रावर पोहचण्यास सांगण्यात आले होते. मात्र आता परीक्षा देण्याऱ्यांना पुढील परिक्षेची तारिख येईपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

UPSC EPFO परीक्षांच्या विद्यार्थ्यांना १६ एप्रिलला परीक्षांचे हॉल तिकीटही देण्यात आले होते. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी यूपीएससी ईपीएफओ परीक्षेचे हॉल तिकीट डाऊनलोड करावे. त्याचप्रमाणे परीक्षेच्या दिवशी त्याची हार्ड कॉपी परीक्षा सेंटरवर घेऊन येणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले होते.  उमेदवारांनी आधार कार्ड, ड्रायविंग लायसन्स, पासपोर्ट साइज फोटो, इलेक्शन कार्ड आणि परिक्षेचे हॉल तिकीट सोबत आणण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.


हेही वाचा – NASA इतिहास घडवला ! मंगळावर सर्वात हलक्या हेलिकॉप्टरचे टेकऑफ

First Published on: April 19, 2021 10:18 PM
Exit mobile version