NASA ने इतिहास घडवला ! मंगळावर सर्वात हलक्या हेलिकॉप्टरचे टेकऑफ

nasa helicopter

अमेरिकन स्पेस एजन्सी NASA ने सोमवारी एक नवा इतिहास रचला. एका मिनिएचर हेलकॉप्टरची Ingenuity चाचणी मंगळावर करण्याचा प्रयोग आज NASA मार्फत करण्यात आला. नासाच्या नियोजनानुसार पहिल वहिल हेलिकॉप्टर हे पॉवर्ड आणि कंट्रोल फ्लाईटच्या रूपात दुसऱ्या ग्रहावर पाठवण्याची ही पहिलीच वेळ होती. जेझिरो क्रेटर येथून म्हणजे पृथ्वीपासून १७३ दशलक्ष मैल दूर असे हेलिकॉप्टरचे उड्डाण झाले. अमेरिकेत सकाळी ३.३० वाजताच्या सुमारास हेलिकॉप्टरची फ्लाईट निघाली. या संपुर्ण घटनेचे लाईव्ह NASA मार्फत करण्यात आले. सहा वर्षांच्या अथक मेहनतीनंतर पहिलेच अशा स्वरूपाचे हेलिकॉप्टर टेक ऑफ झाले आहे.

पहिले हेलिकॉप्टर जे कंट्रोल्ड आणि पॉवर्ड फ्लाईट म्हणून पृथ्वीपासून दूर असे मंगळावर टेक ऑफ झाल्याची माहिती NASA मार्फत जाहीर करण्यात आली आहे. सध्या १५ मिनिटे आणि २७ सेकंद इतका कालावधी हा पृथ्वी आणि मंगळावर रेडिओ सिग्नलसाठी लागत आहे. NASA ला मंगळावरील फोटो आणि व्हिडिओ हे लवकरच मिळणार आहेत. हेलिकॉप्टरला बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यामुळे हे शक्य होईल. याआधी राईट बंधू त्यांनी तयार केलेल्या पहिल्या फ्लाईटचे साक्षीदार होते. पण NASA मार्फतच्या हेलिकॉप्टरने टिपलेला फोटो हा एतिहासिक असा साक्षीदार असल्याचे जेपीएलचे संचालक मायकल वॉटकिन्स यांनी स्पष्ट केले. यापुढच्या आठवड्यांमध्ये आणखी लांबीच्या फ्लाईट्स तयार करण्यात येतील. त्यामध्ये चार ते पाच दिवसांच्या कालावधीच्या बॅटरीचा समावेश असेल.

या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून वातावरणातील स्थितीचा अंदाज घेण्यात येईल. त्यामध्ये गुरूत्वाकर्षण आणि वातावरण अशा गोष्टींच्या नोंदी असतील. मंगळावर गुरूत्वाकर्षण कमी असल्यानेच इंजिनिअर्सनेही अतिशय हलके असे अवघ्या १८०० ग्रॅम वजनाचे हेलिकॉप्टर तयार केले आहे. पृथ्वीपेक्षा खूपच कमी प्रमाणात असे गुरूत्वाकर्षण मंगळावर आहे. म्हणूनच मंगळावर लॅण्डिंग आणि टेक ऑफ अशा दोन्ही गोष्टींची आव्हाने आहेत. या प्रयोगाच्या माध्यमातून अभियांत्रिकी क्षेतात एखाद्या व्हेईकलच्या निर्मितीत डेटा निर्माण करणे हे उदिष्ट होते. याच डेटाचा आधार भविष्यात मोठ्या आकाराचे हेलिकॉप्टर तयार करण्यासाठी होऊ शकतो असे जेपीएलच्या टीम कॅनहॅम यांनी स्पष्ट केले. नासामार्फत गेल्या आठ वर्षांपासून या प्रकल्पाचे काम सुरू होते. याआधीच ११ एप्रिलला ही फ्लाईट शेड्यूल्ड करण्यात आली होती. मात्र पण कमांड सिक्वेन्सच्या अडचणीमुळेच सॉफ्टव्हेअरच्या माध्यमातून या फ्लाईटची चाचणी करण्यात आली.