दिल्लीसह ‘या’ राज्यांमध्ये कडक उष्णतेच्या लाटेची शक्यता, नागरिकांना सावधानतेचा इशारा

दिल्लीसह ‘या’ राज्यांमध्ये कडक उष्णतेच्या लाटेची शक्यता, नागरिकांना सावधानतेचा इशारा

राजधानी दिल्लीसह (Delhi) देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट मोठ्या प्रचंड प्रमाणात वाढताना दिसत आहे. मध्य भारतात उष्णतेच्या लाटेमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. दिल्ली आणि आसपासच्या भागात वाढणाऱ्या उष्णतेबाबत हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

आयएमडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आरके जेनामणी यांनी सांगितले की, दिल्लीतील ऑरेंज अलर्टसोबतच हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश, राजस्थानच्या काही भागात ४ जूनपासून उष्णतेची तीव्र लाट आहे. तापमान ४४°-४७° दरम्यान बदलते, जे आणखी दोन दिवस अशाच प्रकारे कायम राहणार आहे. ते म्हणाले की, उष्णता वाढत असल्यामुळे आम्ही नागरिकांना सावधगिरीने बाहेर पडण्याचा सल्ला देत आहोत.

स्कायमेट वेदरनुसार, आजही दिल्ली एनसीआर, पंजाब, उत्तराखंड, पश्चिम राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि झारखंडच्या विविध भागांमध्ये उष्णतेच्या लाटा वाहू शकतात. मागील २४ तासांत पंजाब, उत्तराखंड, पश्चिम राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि झारखंडच्या काही भागात उष्णतेची लाट पसरली आहे.

दिल्लीत यलो अलर्ट जारी

दिल्लीतील एनसीआरच्या काही भागात उष्णतेचा पारा ४५ अंशांच्या वर जात असल्याने हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. म्हणजेच गरज असेल तेव्हाच घरातून बाहेर पडावे आणि बाहेर पडल्यास उष्णतेपासून संरक्षणाची व्यवस्था करावी. पुढील काही दिवस दिल्लीतील कमाल तापमान ४४ ते ४६ अंशांच्या दरम्यान राहील, असे आयएमडीचे शास्त्रज्ञ आरके जेनामानी यांनी म्हटले आहे.

हिमाचलमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा

हिमाचल प्रदेशमध्ये उना, मंडी, कांगडा, हमीरपूर, बिलासपूर, सिरमौर आणि सोलन येथे ८ आणि ९ जून रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दोन दिवस काही ठिकाणी पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पंजाबमधील तापमानात वाढ

पंजाबमध्ये आज हवामान आणि तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच हवामान विभाग चंदीगडच्या म्हणण्यानुसार, उष्णतेची लाट कायम राहणार असून उष्ण वाऱ्यांमुळे पारा वाढला असल्याचं सांगितलं जात आहे.


हेही वाचा : Delhi Heavy Rain: दिल्लीत मुसळधार पावसामुळे दोन जणांचा मृत्यू; जनजीवनही विस्कळीत


 

First Published on: June 8, 2022 9:41 AM
Exit mobile version