मुंबईच्या आकाशात होणारी दोन विमानांची टक्कर थोडक्यात टळली

मुंबईच्या आकाशात होणारी दोन विमानांची टक्कर थोडक्यात टळली

२९ जानेवारी रोजी एअर इंडियाची अहमदाबाद – चेन्नई फ्लाइट आणि इंडिगोची बंगलुरू – वडोदरा फ्लाइटची एकमेकांना टक्कर होता होता थोडक्यात टळली, अशी माहिती समोर येत आहे. ही टक्कर होता होता वाचली नाहीतर २९ जानेवारी रोजी एक धक्कादायक प्रकार घडला असता. AAIB ने दिलेल्या माहितीनुसार, ही दोन्ही विमानं आठ किमीच्या अंतरादरम्यान होती. मुंबई विमानतळावर आकाशात अवघ्या ३०० फूटाचं अंतर होतं. मात्र सुदैवाने हा अपघात टळला असल्याचे विमान दुर्घटना तपासणी ब्युरे (AAIB) च्या रिपोर्टमधून समोर येत आहे.

असा घडला प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद – चेन्नई फ्लाइट आणि इंडिगोची बंगलुरू – वडोदरा फ्लाइट या दोघांमध्ये केवळ ८ किमीचं अंतर असून अहमदाबाद ते चेन्नई असा प्रवास करणारं हे विमान नेहमी भावनगरवरून रवाना होतं. मात्र त्या दिवशी या विमानाने वेगळा मार्ग निवडला. यावेळी या विमानाने जी विमानं मुंबईमध्ये ब्रेक घेऊन पुढे मार्गस्थ होतात, त्या विमानांचा मार्ग निवडला होता. या मार्गावरूनच बेंगळुरूहून बडोद्याला जाणारं इंडिगोचं विमानही समोरून प्रवास करत होतं. त्याचा मार्ग देखील भरूचजवळून जात होता. त्यामुळे ही दोन्ही विमानं मुंबईवरील आकाशात एकाच मार्गावर आमने-सामने प्रवास करत होती. सुदैवाने मुंबईच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलिंग विभागाने वेळीच धोक्याचा इशारा देऊन सतर्क केले होते. मात्र विमान नियंत्रकाला हा इशारा लक्षात आला नाही.

घटलेल्या या प्रकाराच्या काही वेळाने नियंत्रकाला इशारा कळला तोपर्यंत ही दोन्ही विमानं एकमेकांच्या समोरासमोर येऊन ठाकली होती. त्यांच्यात केवळ आठ किमी एवढंच अंतर होतं. सुदैवाने एअर एशियाच्या वैमानिकाने धोक्याचा इशारा लक्षात घेऊन ते विमान आणखी काही किमी उंचावर नेलं. तेव्हाही दोन्ही विमानांत फक्त ३०० फुटांचं अंतर होतं. सुदैवाने दोन्ही विमानांनी आपला मार्ग बदलल्यामुळे हा भीषण अपघात टळल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. त्या चौकशी समितीच्या अहवालात या प्रसंगाची माहिती नमूद करण्यात आली.


First Published on: August 25, 2021 2:53 PM
Exit mobile version