घरदेश-विदेशतिखट, चमचमीत आणि मसालेदार जेवण म्हणजे आजारांना आमंत्रण

तिखट, चमचमीत आणि मसालेदार जेवण म्हणजे आजारांना आमंत्रण

Subscribe

स्वत:ला कितीही तेलजन्य पदार्थ खाण्यास रोखले तरी प्रत्येकाचा ताबा सुटतोच. तेलकट ,मसालेदार पदार्थ खाल्यामुळे आपले आरोग्य बिघडण्याची दाट शक्यता निर्माण होते.

आपल्या सर्वांना मसालेदार आणि चटपटीत पदार्थ खाण्यास प्रंचड आवडतात. (oily food)मात्र जीभेचे चोचले पुरवत असताना अनेकदा आपण स्वत:हून आजारांना आमंत्रण देत असतो. मसालेदार पदार्थ(Spicy food) मर्यादेत राहूनच ते कधीकधी सेवन केल्यास तर कोणतीही मोठी समस्या निर्माण होत नाही. मात्र स्वत:ला कितीही तेलजन्य पदार्थ खाण्यास रोखले तरी प्रत्येकाचा ताबा सुटतोच. तेलकट ,मसालेदार पदार्थ खाल्यामुळे आपले आरोग्य बिघडण्याची दाट शक्यता निर्माण होते. तेलजण्य पदार्थामुळे आपल्याला कोण-कोणत्या आजाराला समोरे जावे लागू शकते या बद्दल जाणून घेऊया.(health oily and spicy food can cause of many health related problems)

पोटाशी निगडीत समस्या –

जेव्हा आपण जास्त मसालेदार पदार्थाचे सेवन करतो तेव्हा आपल्या शरिराचे पीएच बॅलेंस बिघडते. यामुळे पोटात अॅसिड तयार होऊ लागल्याने जळ-जळ,गॅस,सूजन सारख्या समस्या उद्भवू लागतात.

- Advertisement -

लिवरला साठी धोकादायक-

तेलकट पदार्थ खाल्याने तेल लिवरला जाऊन चिकटते आणि फॅट जमा करु लागते. यालाच वैद्यकीय भाषेत फॅटी लिवर म्हणून संबोधले जाते. तेल,मसाला लिवरला डॅमेज करतात यामुळे लिवर सिरोसिस सारखा आजार होण्याची शक्यता निर्माण होते. दिर्घकाळ तीखट,तेलकट पदार्थ खाल्याने कावीळ,हॅपिटायटिस होऊ शकतो.

वजन वाढण्यास कारणीभूत-

वजन वाढण्यासाठी नेहमी दोन गोष्टी कारणीभूत असतात. पहिलं बॉडीमध्ये ट्रांस फॅट म्हणजे अनहेल्दि फॅटचा साठा जमा होणे. आणि दुसरे कारण म्हणजे आपल्या शरिरातील मेटाबॉलिजम कमी होत जाणे. मसालेदार पदार्थात कॅलरीज जास्त प्रमाणात आढळूत येतात यामुळे वजन वाढते.

- Advertisement -

हे हि वाचा – तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा वापरणं प्रकृतीसाठी अपायकारक

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -