Coronavirus: WHO सर्व सामान्य लोकांकडून देखील घेणार निधी!

Coronavirus: WHO सर्व सामान्य लोकांकडून देखील घेणार निधी!

WHO प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसस

संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या संकटाशी सामना करत आहे. कोरोनाची ही परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप जागतिक आरोग्य संघटनेवर केला जात आहे. दरम्यान बुधवारी जागतिक आरोग्य संघटनेने एका नवी फाऊंडेशनची घोषणा केली आहे. या फाऊंडेशन अंतर्गत कोणताही महामारीचा सामना करण्यासाठी निधी गोळा केला जाईल. यामध्ये केवळ मोठ्या देशांमधूनच नव्हे तर सर्व सामान्यांकडूनही निधी जाणार आहे.

बुधवारी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस यांनी या नव्या फाऊंडेशनची घोषणा केली. त्यांनी ही एक स्वतंत्र संघटना असल्याचे सांगितले. यामध्ये वेगळ्या पद्धतीने निधी उभारला जाणार आहे.

आता प्रत्येक सदस्य देश जागतिक आरोग्य संघटनेला स्वतःकडून निधी देत आहे. या आधारावर जागतिक आरोग्य संघटना जगातील येणाऱ्या अडचणीच्या किंवा संकटाच्या वेळी मदत करते. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर कोरोना विषाणूची ओळख पटविण्यात अपयशी असल्याचा आरोप केला होता. तसेच चीनला पाठिंबा देत असल्याची टीका देखील केली होती.

याशिवाय अमेरिकांचे राष्ट्राध्यक्षकांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचाकांना एक पत्र देखील लिहिले होते. येत्या ३० दिवसांत संघटनेत सुधारणा करा नाहीतर तुमचा निधी कायमचा बंद करू असा पत्राद्वारे जागातिक आरोग्य संघटनेला ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे.

नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने सध्याचे बजेट २.३ बिलियन डॉलर असल्याचे विधाने केले आहे. जागतिक संस्थेच्या मते हे बजेट कमी आहे. अमेरिकेचा निधी थांबला असल्यामुळे सध्या अधिक निधीची आवश्यकता जागतिक आरोग्य संघटनेला आहे.

अमेरिकेच्या दबावनंतर इतर अनेक देशांनीही जागतिक आरोग्य संघटनेला बदल करण्याचे आवाहन केले आहे. तसेच चीनविरुद्ध कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे. डिसेंबरमध्ये जागतिक आरोग्य संघटनेला कोरोना विषाणूलाबद्दल माहित होते. तरीदेखील त्यांनी जगाला इशारा दिला नाही असा आरोप संघटनेवर केला आहे.


हेही वाचा – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जो बिडेन म्हणाले ‘मूर्ख’!


 

First Published on: May 28, 2020 11:01 AM
Exit mobile version