WHO: भारतात कोरोना व्हायरसचा मुक्काम दीर्घकाळच, लोकांना व्हायरससह जगावे लागणार

WHO: भारतात कोरोना व्हायरसचा मुक्काम दीर्घकाळच, लोकांना व्हायरससह जगावे लागणार

गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या (corona virus) विळख्यात अडकले आहे. कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवल्याने हजारो-लाखो लोकांचा मृत्यू झाला. सध्या कोरोना रुग्णसंख्येत घट जरी होत असली तरी अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नाहीये. तसेच डेल्टा व्हेरिएंटने देशाच्या चिंतेत अधिक भर घातली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्य वैज्ञानिक डॉ सौम्या स्वामीनाथन यांनी केलेल्या वक्तव्याने पुन्हा चिंता वाढवली आहे. स्वामीनाथन यांनी म्हटले आहे की, भारतात कोव्हिड -19  महामारी स्थानिक टप्प्यात प्रवेश करत आहे, जेथे कमी किंवा मध्यम पातळीचा संसर्ग सूरु आहे.स्थानिक टप्पा म्हणजे जेव्हा लोकसंख्या व्हायरससह जगणे शिकते. हे साथीच्या टप्प्यापासून पूर्णपणे भिन्न आहे, जिथे विषाणू लोकसंख्येवर वर्चस्व गाजवतो. याचा अर्थ भारताला कोरोनापासून मुक्त होण्यासाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागेल.( WHO Scientist Says People have to live with corona virus infection)

स्वामीनाथने एका मुलाखती दरम्यान वक्तव्य केलं आहे की, कदाचित आपण स्थानिक टप्प्यात प्रवेश करत आहे. जेथे कमी किंवा मध्यम पातळीचा संसर्ग सूरु आहे.मात्र सध्यातरी त्या प्रकारची व्हायरसची वृद्दी आणि परिणाम दिसत नाहीये जसे आपण व्हायरसच्या सुरुवातीला पाहिलं होतं

स्वामीनाथन यांना भारतात अशी परिस्थिती का निर्माण होत आहे असे विचारले असता ते म्हणाले की लोकसंख्येतील वैविध्य आणि भारताच्या विविध भागात रोग प्रतिकारशक्तीच्या स्थितीमुळे हे घडत आहे. ही अस्थिर परिस्थिती अशीच चालू राहण्याची शक्यता आहे.


हे हि वाचा – Corona Vaccination Children: ‘या’ आजाराने ग्रस्त मुलांना मिळणार लसीकरणाकरिता प्राधान्य

First Published on: August 25, 2021 11:24 AM
Exit mobile version