घरदेश-विदेशCorona Vaccination Children: 'या' आजाराने ग्रस्त मुलांना मिळणार लसीकरणाकरिता प्राधान्य

Corona Vaccination Children: ‘या’ आजाराने ग्रस्त मुलांना मिळणार लसीकरणाकरिता प्राधान्य

Subscribe

संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या 70 टक्के पेक्षा जास्त मुलांना काही ना काही आजार होता.यामुळे अशा मुलांच्या लसीकरणावर अधीक भर देण्यात येणार आहे.

कोरोना व्हायरसा प्रसार (corona virus) रोखण्यासाठी देशभरात लसीकरण(corona vaccination) करण्यात येत आहे. ज्येष्ठ  नागरिकांप्रमाणेच आता लहान मुलांचे देखील लसीकरण केले जाणार आहे.तसेच आजाराने ग्रस्त मुलांना लसीकरणासठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.( Corona Vaccination Children) मधुमेह, उच्च रक्तदाब, हार्ट, कॅंसर,निमोनिया सारख्या आजारानेग्रस्त मुलांचे लसीकरण प्रथम करण्याचा निश्चय शासनातर्फे घेण्यात आला आहे.
लसीकरणासाठी स्थापन केलेल्या राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ.एन.के. अरोडा यांनी सांगितले आहे की, लहान मुलांचे लसीकरण करताना प्रथम आजारी मुलांचे लसीकरण केले जाणर आहे. (Corona Vaccination Children Suffering From Diseases Will Get Priority) मुलांमध्ये होणाऱ्या आजारांबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार होत असल्याने याला थोडा वेळ लागू शकतो. तसेच असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की यामध्ये 20 ते 25 रोगांचा सहभाग करण्यात येणार आहे.

12 ते 18 वर्षातील लहान मुलांची संख्या तब्बल 12 कोटी इतकी आहे. तर 18 वर्षावरील मुलांची संख्या 94 कोटींच्या आसपास आहे. आता सरकारला पहिल्यांदा  ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करायचे आहे. आगामी दिवसात 12 ते 18 वर्षातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. यासाठी झायडस कॅडिला कंपनीच्या लसीचा वपार करण्यात येणार आहे.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यांच्या मते, सुरूवातीला झायडस कॅडिला कंपनीच्या लसीचा पुरवठा अधीक होण्याची शक्यता आहे. यासाठी डीएनए आधारीत या लसीला लहान मुलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. याचा अवलंब करण्याकरिता तसेच मागणीसाठी आमची पीएमओ सोबत बैठक होणार आहे.

अलीकडेच, आरोग्य मंत्रालयाचा एक अहवाल देखील समोर आला आहे, त्यानुसार संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या 70 टक्के पेक्षा जास्त मुलांना काही ना काही आजार होता.यामुळे अशा मुलांच्या लसीकरणावर अधीक भर देण्यात येणार आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – Covishield लसीच्या २ डोसमधील अंतर कमी होण्याची शक्यता

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -