US Fire: अमेरिकेच्या ओरेगॉनमध्ये भीषण अग्नितांडव; तीन लाख एकर जमीन आगीच्या विळख्यात

US Fire: अमेरिकेच्या ओरेगॉनमध्ये भीषण अग्नितांडव; तीन लाख एकर जमीन आगीच्या विळख्यात

US Fire: अमेरिकेच्या ओरेगॉनमध्ये भीषण अग्नितांडव; तीन लाख एकर जमीन आगीच्या विळख्यात

अमेरिकेतील राज्य ओरेगॉनमध्ये आगीचं भीषण अग्नितांडव पाहायला मिळाले. या आगीने रौद्र रूप धारण केल्याने ही आग वेगाने पसरत आहे. या आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी अग्निशमन दलाच्या काही गाड्या दाखल झाल्या असून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. अग्निशमन अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलै रोजीनंतर ओरेगॉन येथे लागलेल्या आगीमुळे ३ लाखांहून अधिक जमीन या भीषण आगीच्या भक्षस्थानी गेली आहे. या लागलेल्या आगीत कॅलिफॉर्निया राज्याचा उत्तरेकडील साधारण २५ टक्के इतक्या भागात पसरलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ३ लाख जमीन या आगीत जळून खाक झाली आहे.

या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. हॅलिकॉप्टरच्या मदतीने लागलेल्या आगीवर पाणी टाकून विझवण्याचा प्रयत्न केले जात आहे. साधारणतः २५ टक्के आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. परंतु, वेगवान वारा, वादळ आणि विजा पडत असल्याने या आगीची स्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

असे सांगितले जात आहे की, या जंगलातील आजू-बाजूच्या परिसरात वेगाने वारा वाहत होता. ज्यामुळे आगीचे रौद्ररूप कमी करण्यासाठी खूपच अडथळे निर्माण होत होते. या आगीचे रूप इतके भयंकर होते की, एका ठिकाणी लागलेली आग विझवताना दूसऱ्या ठिकाणची आग अधिक वेगाने फैलत असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. केवळ एका दिवसात या आगीने २० हजार एकर हून अधिक क्षेत्र आपल्या विळख्यात घेतले होते.


First Published on: July 20, 2021 12:19 PM
Exit mobile version