बॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्री करतात अभिनयासह चित्रपटांची निर्मिती

बॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्री करतात अभिनयासह चित्रपटांची निर्मिती

आजच्या युगात महिला पुरूषांपेक्षा एक पाऊल पुढेचं आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिला आपलं मानाचं स्थान मिळवत आहेत. हाचं बदल आता आपल्याला बॉलिवूडमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. पूर्वी फक्त कॅमेरा समोर झळकऱ्या अभिनेत्री आता स्वतः चित्रपटांची निर्मिती करू लागल्या आहेत. अनुष्का शर्मा, प्रियांका चोपडा, कंगना रनौत यांसारख्या बऱ्याचं अभिनेत्री सुंदर  अभिनयाबरोबरंचं आता पडद्यामागचा कार्यभार सुद्धा सांभाळत आहेत.


अनुष्का शर्माने यशराज फिल्म्सच्या ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.  या चित्रपटात शाहरूख खान तिच्यासोबत सह कलाकार म्हणून होता. बऱ्याचं चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिने ‘क्लीन स्लेट’ फिल्म्स नावाचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं. ‘परी बाबुल’ आणि ‘एन एच १०’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली.

दीपिका पादुकोणने  २०१८ मध्ये तिचं प्रोडक्शन हाउस सुरु केलं होतं. २०२० मध्ये या प्रोडक्शनद्वारे ‘छपाक’ हा चित्रपट बनवला. या बरोबरंचं रणवीर सिंहचा चित्रपट ‘83’ सुद्धा याचं प्रोडक्शन हाउसद्वारे  तयार झाला.

प्रियांका चोपडाने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत तिची एक खास ओळख तयार केली आहे. तिने ‘पर्पल पेबल पिक्चर्स’ नावाचं एक प्रोडक्शन हाऊस चालू केलं आहे. या प्रोडक्शनद्वारे हाउस ‘स्काय इज पिंग’ हा पहिला चित्रपट बनवण्यात आला होता.

बॉलिवूडची धाकड गर्ल कंगना रनौतने तिच्या प्रोडक्शन हाउस ‘मणिकर्णिका फिल्म्स’ द्वारे ‘टीकू वेड्स शेरू’ हा चित्रपट बनवला होता.

गंगूबाई काठियावाडी चित्रपटात दमदार अभिनय करणाऱ्या आलिया भट्टने सुद्धा ‘इटरनल सनशाइन’ नावाचं प्रोडक्शन हाउस चालू केलं आहे.

ट्विंकल खन्नाने तिच्या प्रोडक्शन हाउसद्वारे ‘खट्टा मीठा’, ‘तीस मार खां’ यांसारखे चित्रपट तयार केले आहेत.

तापसी पन्नूने ‘आउटसाइडर फिल्म्स’ या नावाचं प्रोडक्शन हाउस चालू केलं आहे. तिला तिच्या चित्रपटांमध्ये फिल्मी बॅकग्राउंड नसणाऱ्या कलाकारांना संधी द्यायची आहे.

अभिनेत्री हेमा मालिनीने ‘एचएम’ हे प्रोडक्शन हाउस चालू केलं असून तिने तिच्या प्रोडक्शनद्वारे  ‘दिल आशना है’ आणि ‘मोहिनी’ हे चित्रपट तयार केले आहेत.


हेही वाचा – Video : अंकिता लोखंडेला पतीने दिलं खास गिफ्ट, पाहून तुम्हीही म्हणाल ह्योच नवरा पाहिजे

First Published on: March 8, 2022 10:21 PM
Exit mobile version