घर ताज्या घडामोडी Video : अंकिता लोखंडेला पतीने दिलं खास गिफ्ट, पाहून तुम्हीही म्हणाल ह्योच...

Video : अंकिता लोखंडेला पतीने दिलं खास गिफ्ट, पाहून तुम्हीही म्हणाल ह्योच नवरा पाहिजे

Subscribe

या महिला दिना दिवशी माझ्या पतीने मला खास किंमती गिफ्ट दिले आहे. आमच्या दोघांकडून सगळ्या प्रेमळ महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा असे म्हणत अंकिताने व्हिडीओ शेअर केला.

बॉलिवूडचं लव्हेबल कपल अंकिता लोखंडे (Ankita Lokhande ) आणि विक्की जैन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. १४ डिसेंबर २०२१ ला दोघांनी लग्न केले. दोघांनी आज एकत्र महिला दिन साजरा केला. विक्की जैनने (Vicky Jain )  त्याच्या लव्ह लेडीला महिला दिनाच्या खास शुभेच्छा देत तिला एक खास गिफ्ट दिले. अंकिताने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत नवऱ्याने मला खास गिफ्ट दिल्याचे सांगत असा नवरा सर्वांना मिळो असे म्हटलेय.

या महिला दिना दिवशी माझ्या पतीने मला खास किंमती गिफ्ट दिले आहे. आमच्या दोघांकडून सगळ्या प्रेमळ महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा असे म्हणत अंकिताने व्हिडीओ शेअर केला.

- Advertisement -

अंकिताला नवऱ्याने असे कोणते गिफ्ट दिले याची उत्सुकता सर्वांना अंकिताच्या व्हिडीओ खालील कॅप्शन वाचून लागली होती. त्यासाठी पाहा अंकिता आणि विक्की यांचा व्हिडीओ

- Advertisement -

अंकिता व्हिडीओत म्हणतेय, विक्कीने महिला दिनानिमित्त त्याच्या पत्नीसाठी इतके सुंदर गिफ्ट देण्याचे ठरवले आहे ते असे आहे की, आज दिवसभर विक्की काहीच बोलणार नाही फक्त त्याच्या पत्नीचे ऐकणार आहे. सर्व पुरुषांनी आपल्या पत्नीसाठी असे करावे अशी विनंती देखील विक्की अंकिता या व्हिडीओमधून करताना दिसत आहेत.

तर दुसऱ्या पोस्टमध्ये विक्की आणि अंकिता ‘दम मारो दम’ या गाण्यावर घरात डान्स करताना दिसत आहे. विक्की आणि अंकिताचा डान्स पाहून त्यांच्या चाहत्यांना हसू आवरलेले नाही.  ‘जेव्हा सर्व पुरूष एकाच गाण्यावर नाचतात’, असे म्हणत अंकिताने हा व्हिडीओ शेअर केलाय आणि पुन्हा एकदा महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


हेही वाचा –  Women’s Day : विक्की कौशलने शेअर केला आई आणि बायकोचा अनसीन फोटो

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -